अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. 

Updated: Aug 29, 2022, 11:06 PM IST
अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज... title=

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. दररोज ती तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. ज्यामुळे ती खूप लाइमलाइटमध्ये असते. आज पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे
आनंद महिंद्रा, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आणि एक प्रसिद्ध उद्योगपती, सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि ते दररोज काहीतरी शेअर करत असतात. आता त्यांनी रवीना टंडनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये  अभिनेत्री 'क्लब महिंद्रा'चे समर्थन करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एका ठिकाणी रवीना म्हणतेय की, या सर्व सुविधा 80 हून अधिक रिसॉर्ट्समध्ये आहेत. यावर रवीनाला टॅग करत आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की,  "मी आतापर्यंत यापैकी 10% रिसॉर्ट्समध्ये देखील गेलो नाही, परंतु आता तुम्ही मला मनवलं रवीना टंडन , मी माझी बॅग पॅक करत आहे."

रवीना टंडन नवीन थार खरेदी करत आहे
आनंद महिंद्राच्या या ट्विटला रवीना टंडनने प्रत्युत्तर दिलं असून तिने थार खरेदी करण्याबाबत सांगितलं आहे. अभिनेत्रीने लिहिलं, "सर, मी देखील एक भाग बनत आहे आणि नवीन महिंद्रा थार खरेदी करणार आहे. मी या वाहनातून कार चालवायला शिकले आणि माझ्या कॉलेजच्या दिवसातही ही पहिली कार होती. आणि मी ही गोष्ट पुढे चालू ठेवणार आहे.