ऑक्सिजनचा तुटवडा : 'लोकांना लुटलं जातंय', रविना टंडन रूग्णालयावर भडकली

रवीना सद्याच्या परिस्थितीवर भडकली

Updated: May 4, 2021, 05:12 PM IST
ऑक्सिजनचा तुटवडा : 'लोकांना लुटलं जातंय', रविना टंडन रूग्णालयावर भडकली  title=

मुंबई : देशभरात कोरोनाचा तांडव पाहायला मिळत आहे. याकाळात अगदी हॉस्पिटल ते रोजगारपर्यंतचे प्रश्न जनसामान्यांना पडत आहे. प्रशासनाचे प्रश्न आणि सरकारी यंत्रणा प्रयत्नात असूनही कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या प्रयत्नात आहे. तेथे बॉलिवूड कलाकार देखील आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत अभिनेत्री रवीना टंडन देखील सहभागी झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संकटात मदत करण्यासाठी अभिनेत्री रवीना टंडन समोर आली आहे. त्यांनी ऑक्सिजन ते मेडिकल किटपर्यंत उपलब्ध करण्याचा प्रयत्न रवीना करत आहे. तसेच रवीनाने ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यासही मोठी मदत केली आहे. 

रवीना यांच्या सोशल मीडियावर अकाऊंट या संदर्भात मॅसेज येत आहेत. मॅसेजच्या माध्यमातून सतत रवीना लोकांच्या संपर्कात आहे. याकरता रवीनाने टीम तयार केली आहे. जी टीम प्रत्येक मॅसेजकडे लक्ष ठेवून असते. 

अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आहे. ती एकमेकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. रवीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'चला सगळ्यांनी मदत करा. आपण आपल्या देशाची जखम भरून काढूया. काही मदत लागल्यास तुम्ही स्वतः मॅसेज करा. कृपा करून गरजू व्यक्तींना मदत करा. तुम्ही आणि मी मिळून कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. धन्यवाद.'

रवीनाने म्हटलं आहे की,'आता देशात जे होतं आहे त्यामुळे खूप अडचणी निर्माण होत आहे. लोकांना रूग्णालयात लुटलं जात आहे. सामानाकरता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याकरता आम्ही ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करत आहेत. जे लोकं खर्च करू शकत नाहीत त्यांना आम्ही याचा पुरवठा करणार आहोत. याकरता एनजीओशी संपर्क करायला हवा. दिल्लीला पहिल्यांदाच 300 ऑक्सिजन सिलेंडर पाठवण्यात येत आहेत.'