'ते मला हातोडीनं मारायचे...', लहाणपणी अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली होती वाईट वागणूक

This Actor's father used to beat him with hammer : या अभिनेत्याला त्याचे वडील लहाण असताना हातोडीनं मारायचे... स्वत: खुलासा करत सांगितलं

दिक्षा पाटील | Updated: Mar 17, 2024, 12:20 PM IST
'ते मला हातोडीनं मारायचे...', लहाणपणी अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली होती वाईट वागणूक title=
(Photo Credit : Social Media)

Ravi Kishan's father used to beat him with hammer : आमिर खान निर्मित 'लापता लेडीज' या चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ लागली आहे. या चित्रपटात अभिनेता रवी किशनची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. रवी किशन हे नेहमीच त्यांच्या कामाला घेऊन चर्चेत असतात. मात्र, आता ते एका खासगी कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांमध्ये असलेल्या नात्याच्या चढ-उताराविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की कसे त्यांचे वडील सुरुवातीला त्यांच्या अभिनेता होण्याच्या विरोधात होते. 

रवीन किशन यांनी नुकतीच ही मुलाखत 'ब्रूट' ला दिली आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करत रवी किशन म्हणाले की सुरुवातीला त्यांनी शेजारी असलेल्या रामलीलामध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या वडिलांना आश्चर्य झाले आणि त्यासाठी अनेकदा त्यांचे वडील त्यांना शिक्षा द्यायचे. हा वाद इतका वाढला की वडिलांचा राग आणि शारीरिक अत्याचारामुळे रवी यांनी वयाच्या 17 व्या वर्षी घर सोडलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी सांगत रवी किशन म्हणाले की 'माझे वडील माझी खूप जास्त मारहान करायचेय आणि ते मला हातोडीनं मारायचे. ते मला मारणार हे माझ्या आईला माहित होते कारण ते पुजारी असल्यानं त्यांच्यात भावना नसतात. त्यामुळे आई म्हणाली पळून जा.' रवि यांनी पुढे सांगितलं की 'ते जेव्हा पळाले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 500 रुपये होते आणि मुंबईला जाणारी ट्रेनमध्ये चढले.' 

रवी किशन यांनी पुढे सांगितलं की त्यांना आता असं वाटतं की त्यांचे वडील योग्य सांगत होते. ते त्यांच्या करिअरसाठी स्ट्रिक्ट होते. ते एक ब्राह्मण पुजारी होती. त्यांची इच्छा होती की मुलानं योग्य मार्ग निवडावा. याविषयी सांगत रवी किशन म्हणाले की 'त्यांनी कधीच विचार केला नाही की त्यांच्या कुटुंबात एका कलाकाराचा जन्म होईल. तर त्यांनी वडिलांना वेगवेगळ्या रुपात पाहिले त्यामुळे ते आज आहेत तसे झाले. 'आता रवी यांच्या वडिलांना त्यांना मिळालेलं यश पाहून आनंद होतो. त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त करत रवी यांना सांगितलं की 'तू आमचं गौरव आहेस.'

हेही वाचा : 3 Idiots : 'त्या' सीनसाठी आमिर, माधवन आणि शरमननं केलं होतं मद्यपान! 15 वर्षांनंतर अभिनेत्यानंचृ केला खुलासा

'लापता लेडिज' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर किरण रावनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तर आमिर खान आणि ज्योती देशपांडेनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.