मुंबई: भोजपुरी अभिनेता रवि किशन यांची मुलगी रीवा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'सब कुशल मंगल' या सिनेमाच्या माध्यमातून रीवा आपले नशीब आजमावणार आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी आणि निर्माते प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा सिनेमात झळकणार आहे. सिनेमात अक्षय खन्ना ही दिसणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन दिग्दर्शक करण कश्यप करणार असून निर्मिती निर्माता नितिन मनमोहन यांची मुलगी प्राची करणार आहे.
Ravi Kishan's daughter Riva debuts in films... Will costar opposite Padmini Kolhapure and producer Pradeep Sharma's son Priyaank... Stars Akshaye Khanna... Titled #SabKushalMangal... Directed by Karan Kashyap... Prachi, producer Nitin Manmohan's daughter, will produce the film. pic.twitter.com/TzvRKIVxdl
— taran adarsh (@taran_adarsh) January 29, 2019
नितिन मनमोहन हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी रवि किशन यांना आर्मी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आणले होते. आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी रीवा फार खूश आहे. ' जेव्हा फोन आला तेव्हा मी अमेरीकेत होते, वडीलांचे मित्र मोईन बेग यांनी मला ही गोड बातमी दिली.' आपल्या मुलीला मिळालेल्या संधीसाठी रवि किशन फार खुश आहेत.
'रीवा ला लहानपणापासूनच अभिनयात रस होता आणि अभिनय क्षेत्रातच ती तिचे भविष्य उज्ज्वल करेल. मला खूप आनंद आहे. मला रीवावर खूप गर्व आहे'. असे वक्तव्य रवि किशन यांनी केले. रीवाने अभिनेता नसीरूद्दीन शाह यांच्या प्ले ग्रुप मध्ये एक वर्ष अभिनयाचे धडे गिरवीले आहेत आणि आता ती बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी तयार झाली आहे.