नाग चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या वडिलांची प्रतिक्रिया

मुलीच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयानंतर समंथाच्या वडील म्हणाले...

Updated: Oct 6, 2021, 09:42 AM IST
नाग चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या वडिलांची प्रतिक्रिया title=

मुंबई : घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य चर्चेचा विषय बनले आहेत.साऊथची सुप्रसिद्ध जोडी सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहेत. दोघे आता विभक्त झाले आहेत. नागा आणि समंथा यांचा घटस्फोट झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सामंथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल एका न्यूज पोर्टलला सांगतानी . म्हणाले की जेव्हा त्यांना ही बातमी कळली तेव्हा त्यांचे मन स्तब्ध झाले.

जोसेफ म्हणाले की, 'अपेक्षा होती की वेळेनुसार सर्व काही सुरळीत होईल. त्यांनी सामंथाला तिच्या निर्णयाबद्दल पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा काही फायदा झाला नाही. घटस्फोटानंतर त्यांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केले आणि विभक्त होण्याची घोषणा केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सामंथा आणि नागा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या विभक्ततेची बातमी देताना लिहिले, "आमच्या सर्व चाहत्यांसाठी, खूप विचारविनिमय केल्यानंतर, आम्ही पती -पत्नी म्हणून आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की एक दशकाची मैत्री आमच्या नात्याचा भक्कम पाया होती आणि आम्हाला खात्री आहे की आमच्यातील हे मैत्रीचे बंधन कायमचे राहील.

लग्नापूर्वी दोघांनी जवळजवळ एक दशक एकमेकांना डेट केले होते. 2017 मध्ये दोघांनी दक्षिण भारत आणि ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार लग्न केले.