'तारक मेहता'चे बाबूजी जेठालालपेक्षाही वयाने आहेत लहान

मालिका जगतात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका चांगलीच प्रसिद्ध आहे. ही मालिका सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच या मालिकेने चांगला टीआरपी मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही या मालिकेचे चाहते कमी झालेले नाहीत.

Updated: Jul 20, 2017, 07:45 PM IST
'तारक मेहता'चे बाबूजी जेठालालपेक्षाही वयाने आहेत लहान title=

मुंबई : मालिका जगतात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका चांगलीच प्रसिद्ध आहे. ही मालिका सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच या मालिकेने चांगला टीआरपी मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही या मालिकेचे चाहते कमी झालेले नाहीत.

28 जुलै 2008 रोजी ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. अगदी पहिल्या दिवसापासून मालिकेतील मोठ्या प्रमाणातील कलाकार काम करत आहेत. 

या मालिकेतील अनेक पात्रांना आता त्यांच्या खऱ्या नावापेक्षा त्यांच्या मालिकेतील नावांनीच ओळखले जाते. या मालिकेतील कलाकारांच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहीत नाहीत. 

या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशीचे वय मालिकेतील बाबूजीची भूमिका साकारणाऱ्या अमित भट यांच्यापेक्षा सहा वर्षांनी अधिक आहे. 

कलाकार आणि त्यांचे वय
दिलीप जोशी उर्फ जेठालाल - ४९वर्षे
अमित भट उर्फ चंपकलाल - ४३ वर्षे
शैलेश लोढा उर्फ तारक मेहता - ४७ वर्षे
मुनमुन दत्ता उर्फ बबिता - २९ वर्षे
नेहा मेहता उर्फ अंजली मेहता - २९ वर्षे
आझाद कवी उर्फ डॉ. हंसराज - ४४ वर्षे
जेनिफर मिस्त्री उर्फ रोशन कौर - ३८ वर्षे
तनुज महाशब्दे उर्फ सुब्रमण्यम अय्यर - ४२ वर्षे
शाम पाठक उर्फ पत्रकार पोपटलाल पांडे - ४१ वर्षे