#Racist : लहान मुलीवर टिपणी केल्यामुळे राघव चर्चेत, मागितली माफी

राघवने दिलं स्पष्टीकरण

Updated: Nov 16, 2021, 01:13 PM IST
#Racist : लहान मुलीवर टिपणी केल्यामुळे राघव चर्चेत, मागितली माफी  title=

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात सध्या होस्ट, सुत्रसंचालक राघव जुयाल (Raghav Juyal) चांगलाच चर्चेत आहे. राघवचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओत राघव वेगळ्याच भाषेत बोलत आहे. वेगळ्या भाषेत चर्चा केल्यानंतर राघव गुवाहाटीच्या एका लहान मुलीला बोलवतो. त्याचं हे बोलावणचं सोशल मीडियावर पसंत पडलेलं नाही. 

सोशल मीडियावर याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राघवला ट्रोल केलं जात आहे. राघवने लहान मुलीसोबत गैरवर्तण केल्याच म्हटलं जात आहे. राघवला #Racist म्हटलं आहे. या व्हिडीओमुळे राघवला आणि त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. 

डान्सर आणि होस्ट राघव जुयालने 'डान्स दिवाने' या डान्स रिऍलिटी शोमध्ये 'वंशवादाचा' आरोप केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा गैरसमज स्पष्ट केला आहे. उल्लेखनीय आहे की, राघव हा डान्स शो होस्ट करतो ज्यामध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा, तुषार कालिया, धर्मेश येलांडे आणि माधुरी दीक्षित न्यायाधीशांच्या पॅनेलमध्ये बसतात.

राघवने दिलं स्पष्टीकरण 

राघव जुयालने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये तो आसाममधील एका स्पर्धकाला 'वादग्रस्त परिचय' देण्यामागील खरी गोष्ट सांगत आहे. त्याने सुरुवात केली की, या छोट्या क्लिपने एक मोठा गैरसमज कसा निर्माण केला. ज्यामुळे त्याच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करण्यात आली. राघवला वेगवेगळ्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. त्याने पुढे सांगितले की, आसामच्या गुंजन सिन्हा नावाच्या स्पर्धकाला तिच्या छंद आणि आवडींबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने खुलासा केला की ती 'चीनीमध्ये बोलू शकते'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

लोकांची वेगवेगळी चर्चा

याशिवाय राघव जुयाल म्हणाला की, तरुण स्पर्धक 'गिबरिश चायनीज'मध्ये बोलतो. पुढे त्याने सांगितले की, गेल्या काही एपिसोड्समध्ये राघव तिच्याशी याच पद्धतीने संवाद साधत आहे. आज अचानक हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच आपले ईशान्येत कुटुंब आणि मित्र आहेत. त्यामुळे असा चुकीचा समज कुणीही करू नये.