मुंबई : 'दिल तो पागल हैं', 'ऐसा देस हैं मेरा', 'तुझे देखा तो...', 'ये गलिया ये चौबारा...' अशी अनेक गाणी गावून लता दीदींनी (lata mangeshkar) एक आविष्कार घडवला. आज दीदी आपल्यात नाहीl.. पण त्यांची कला आपल्याला कायम प्रेरणा देते राहिल. 6 फेब्रुवारी रोजी दीदींनी अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. आज दीदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र चाहत्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहे. दीदी फक्त त्यांच्या गोड आवाजामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. (lata didi sindoor)
एक किस्सा आहे, त्यांच्या कापाळावरील कुंकूचा. महिला लग्नानंतर सिंदूर लावतात, पण दीदी अविवाहित असूनही सिंदूर लावयच्या. त्यामागे कारण देखील फार अर्थपूर्ण आहे. (lata didi personal life)
आज लतादीदी अनेक गोष्ट मागे ठेवून गेल्या आहे आहेत. त्यातील एक म्हणजे दीदी लावत असलेल्या सिंदूरचं रहस्य. लतादीदी सिंदूर का लावायच्या याबद्दल तबस्सुम यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
तबस्सुम यांनी मुलाखतीत दीदींना विचारलं, 'तुम्ही सिंदूर का लावता?' तबस्सुम यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना दीदी म्हणाल्या, 'मी माझ्या संगीताच्या नावाचं कुंकू सिंदूर म्हणून लावते...' लता दीदींनी दिलेलं हे उत्तर हृदय पिळवटून टाकणारं होतं. (lata didi song)
संगीतावर असलेलं प्रेम, प्रत्येक गाण्याला दीदींनी दिलेला न्याय, नव्या गायकांसाठी प्रेरणा.. अनेकांच्या प्रेरणास्थानी दीदी आहेत. 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि कलाविश्वात, चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी कोणीही भरु शकणार नाही.