म्हणूनच सैफ आणि सोहा इनायाला तैमुरसोबत ठेवत नाही ...

तैमुर अली खान हा सैफिनापेक्षा इंटरनेटवर अधिक लोकप्रिय आहे. त्याचा निरागस चेहरा अनेकांना अवडतो.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 20, 2018, 10:06 AM IST
म्हणूनच सैफ आणि सोहा इनायाला तैमुरसोबत ठेवत नाही ...   title=

मुंबई  : तैमुर अली खान हा सैफिनापेक्षा इंटरनेटवर अधिक लोकप्रिय आहे. त्याचा निरागस चेहरा अनेकांना अवडतो.

आता तैमुरच्या बरोबरीने त्याच्या आतेबहिणेचीही फोटो सोशलमीडियावर व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे.  

इनाया आणि तैमुर 

सैफची बहिण म्हणजेच सोहा अली खानची मुलगी अवघ्या काही महिन्यांची आहे. तैमुर आणि इनायामध्ये अगदीच काही महिन्यांचं अंतर आहे. त्यामुळे या दोघांमुळे घरात दंगामस्ती होणं सहाजिकच आहे. मात्र सैफ आणि सोहा या दोघांना एकत्र ठेवायला घाबरतात अशी माहिती नुकतीच सोहाने एका मुलाखतीमध्ये दिली आहे. 

का घाबरतात सैफ आणि सोहा? 

तैमुर दिसयला गोंडस आणि खेळकर आहे. मात्र तो ज्या वयाच्या ट्प्प्यात आहेत त्यामध्ये तो रिअ‍ॅक्ट करायला शिकत आहे. त्याच्या हाताची पकड घट्ट होत आहे. तैमुर आता दिसेल ती गोष्ट फेकायला लागला आहे. ओरखडे काढायला लागला आहे. अशी माहिती सोहाने दिली आहे. 

तैमुरच्या या वागणुकीमुळेच सैफ नाजूक इनायाला त्याच्यापासून लांब ठेवणंच पसंत करतो. तैमुर आणि इनायाला फार काळ एकटं आणि एकत्र ठेवणं धोक्याचं असल्याचे सोहा गंमतीने म्हणाली आहे.  

सैफ आणि करिनाकडून मिळतात टीप्स 

सैफ आणि करिना  वेळोवेळी आम्हांला पॅरेन्टिंग टीप्स देतात.  त्यामुळे इनाया आणि तैमुरला सांभाळणं सोपं होतं. तैमुर आणि इनायामध्ये अवघ्या काही महिन्यांचा फरक आहे. यामुळे तैमुरमध्ये होणारे बदल पाहून इनायासाठी आम्ही तयार राहतो असेही सोहा म्हणाली. 

सैफ आणि सोहा यांच्यामध्ये 8 वर्षांचा फरक आहे. पण तैमुर आणि इनायामध्ये केवळ काही महिन्यांचा फरक असल्याने ते एकमेकांचे चांगले मित्र होतील, भविष्यात तैमुर इनायाचा प्रोटेक्टिव्ह भाऊ होईल अशी इच्छा सोहाने व्यक्त केली आहे.