'ती सध्या काय करतेय', 'कल हो ना हो' मध्ये शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणारी झनक सध्या काय करतेय?

शाहरुख खान, सैफ अली खान आणि  प्रीती झिंटा अशी मोठी स्टारकास्ट असलेला सिनेमा 'कल हो ना हो' या सिनेमात बालकलाकार म्हणून

Updated: Mar 4, 2021, 05:23 PM IST
'ती सध्या काय करतेय', 'कल हो ना हो' मध्ये शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणारी झनक सध्या काय करतेय?

मुंबई :  शाहरुख खान, सैफ अली खान आणि  प्रीती झिंटा अशी मोठी स्टारकास्ट असलेला सिनेमा 'कल हो ना हो' या सिनेमात बालकलाकार म्हणून जी घरा-घरात पोहेचली ती जिया कपूर म्हणजेच झनक कपूर सध्या सिनेसृष्टीमधून गायब झाल्याचं पहायला मिळतंय. 'कल हो ना हो' या सिनेमात शाहरुखची छोटी सह-अभिनेत्री जिया कपूर आहे. जी तिच्या आजीचे प्रेम जिंकण्याची आस बाळगते.  आता या छोट्या जियाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

'कल हो ना हो' मधील बालकलाकार झनक शुक्ला हिनं एक खुलासा केला आहे की, तिने अभिनयातून आपलं पाऊल मागे घेतले आहे. मात्र आता तिला अभिनय करायचा नाही, तिला आपलं करिअर गाण्यातून घडवायच आहे. त्यासाठी तिला न्यूझीलंडला स्थायिक व्हायचं आहे.

15 वर्षांची होई तोर्पंत तिने खूप काम केलं आणि त्यानंतर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा झनकने केला. ती लहाणपणी खूपच बडबडी आणि मस्तीखोर होती. आतामात्र ती या सगळ्यांच्या 'विरुद्ध' आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 तिला एकटीला वेळ घालवायला आवडतं. बालपणाच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत कठोर परिश्रमानंतर, तिने अनेक ऑडिशन दिल्या होत्या. त्यातलीचं एक सलमान खानच्या सिनेमासाठी तिनं दिलेलं ऑडिशन तिने खूप वाईट दिल्याचं ती म्हणतेय, तरी माझं सिलेक्शन कसं झालं, असा प्रश्न तिला कायम पडला

"मी लहान होतो तेव्हा मी असा विचार करायचो की, जेव्हा मी २५ वर्षांची होईन, तेव्हा मी खूप कमाई करीन, आणि माझं लग्न होईल," ती हसत हसत म्हणाली, "मी आता 25 वर्षांची आहे आणि मी काही मिळवत नाही, असं काहीचं नाही. आता मी माझं आयुष्य खूप आनंदाने घालवू ईश्चिते. मी माझ्या आई-बाबांनादेखील माझ्याप्रमाणेच जगायला सांगतेय. झनकने 'करिश्मा का करिश्मा' या मालिकेतदेखील रोबोटची भूमिका साकारली होती.