'मिस हवाहवाई'च्या आठवणीत जान्हवीची भावनिक पोस्ट

निमित्त आहे... 

Updated: Aug 13, 2019, 11:54 AM IST
'मिस हवाहवाई'च्या आठवणीत जान्हवीची भावनिक पोस्ट

मुंबई : दाक्षिणात्य आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या तसंच सौंदर्याच्या बळावर अधिपत्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रीदेवी. 'मै ख्वाबों की शहजादी' असं म्हणत 'मिस हवाहवाई'च्या रुपात त्या जेव्हा प्रेक्षकांसमोर आल्या, तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. 

रुपेरी पडद्यावर श्रीदेवी यांचा वावर म्हणजे प्रेक्षकांसाठी एक परवणीच. अशी ही अष्टपैलू अभिनेत्री आज आपल्यात नाही. पण, कलाकृतींच्या माध्यमातून त्यांचा वावर मात्र कायमस्वरुपी प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. शिवाय त्यांची मुलगी म्हणजेच जान्हवी कपूर ही आपल्या आईप्रमाणेत अभिनयाचा वारसा पुढे चालवत या चित्रपट वर्तुळात स्थिरावत आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या जान्हवीने तिच्या अकाऊंटवरुन एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट खास ठरण्याचं कारण म्हणजे तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी. आपल्या आईच्या जन्म दिनाच्यावेळी तिची कमतरता जाणवत असतानाही जान्हवीने एक फोटो पोस्ट करत या दिवसाला आनंदाची किनार दिली आहे. 'हॅपी बर्थडे मम्मा.... माझं तुझ्यावर फार प्रेम आहे...', असं कॅप्शन तिने श्रीदेवी यांच्या एका सुरेख फोटोसोबत लिहिलं. 

 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

श्रीदेवी आपल्यात नसल्याचं दु:ख त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायमच असणार. पण, यातही त्यांच्या आठवणींच्या बळावर आयुष्यात आनंदाची उधळण करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच पाहायला मिळाला आहे.  आजच्या दिवशी अनेक चाहत्यांनीही त्यांच्या या आवडत्या अभिनेत्रीविषयी पोस्ट लिहित भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे.