'मुंबई सुरक्षित नाही' म्हणणाऱ्या मिसेस फडणवीसांना रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला

आदित्य ठाकरेंवरही रेणुका शहाणेंनी साधला निशाणा 

Updated: Aug 4, 2020, 02:12 PM IST
'मुंबई सुरक्षित नाही' म्हणणाऱ्या मिसेस फडणवीसांना रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला

 

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असं असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी यांनी 'मुंबई सुरक्षित नाही' असं म्हणतं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं आहे. या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सणसणीत टोला लगावला आहे. 

रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीकाळाची आठवण करून दिली आहे. शहाणे विचारतात की, फडणवीस सरकारच्या काळात एलफिस्टन पूल कोसळला यामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा अमृता फडणवीस यांना मुंबईत असुरक्षित वाटलं नाही का? असं ट्विट केलं आहे. 

रेणुका शहाणे कायमच घडामोडींवर आपलं मत व्यक्त करत असतात. सुशांतचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या असा देखील सवाल केला जात आहे? या सगळ्यावर रेणुका शहाणे आपलं मत व्यक्त केलं आहे. याच प्रकरणावर त्यांनी आदित्य ठाकरेंना देखील एक सवाल केला आहे. सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. याबाबत त्यांनी आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील 'नेपोटीझम' आणि 'बॉलिवूड गँग' या दोन्ही अधोरेखित झाल्या आहेत. याप्रकरणातील सत्य हे जगासमोर यायलाच हवं अशी मागणी जोर धरू लागली आहे.