रिंकू पोहोचली रोमॅन्टिक ठिकाणी, कोणाची पाहतेय वाट?

रिंकूची प्रत्येक पोस्ट चर्चेत असताना नुकताच तिने एक खास व्हिडिओ शेअर केलाये. ज्यात ती एका रोमॅन्टिक ठिकाणी पोहोचलीये.

Updated: Jul 5, 2021, 09:45 AM IST
 रिंकू पोहोचली रोमॅन्टिक ठिकाणी, कोणाची पाहतेय वाट? title=

मुंबई : सैराट फेम आर्चीने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. सैराटनंतर आर्चीने अनेक सिनेमांमध्ये कामं केली. तिच्या दमदार अंदाजाचं नेहमीच कौतुक झालं. सोशल मीडियावर देखील रिंकूच मोठं फॅन फोलोविंग आहे. विविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. 

रिंकूची प्रत्येक पोस्ट चर्चेत असताना नुकताच तिने एक खास व्हिडिओ शेअर केलाये. ज्यात ती एका रोमॅन्टिक ठिकाणी पोहोचलीये.निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण एक्सप्लोर करण्यात रिंकूने ठरवलं, आणि तिने भटकंतीला सुरुवात केलीये. 

रिंकू काही महिन्यापूर्वी परदेशात राहत होती. आगामी प्रोजेक्टसच्या शुटींगसाठी रिंकू बाहेर गेली होती. त्यानंतर ती लगेचच भारतात परतली आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला.पण सध्या ऑन स्क्रिन जरी रिंकू प्रेक्षकांच्या संपर्कात नसली , तरी सोशल मीडिया ती अॅक्टीव्ह असल्याचं दिसून येतं.

हा व्हिडीओ पोस्ट करत रिंकू म्हणते, "निसर्ग सर्वकाही ठिक करतो. मास्क घाला आणि सुरक्षित रहा"  

निसर्गरम्य ठिकाणी फिरायला रिंकूला फार आवडतं. आणि म्हणूनच ती शेतातील कामं देखील करताना दिसून येते.