मी तुझा बाप आहे, सेक्रेटरी नाही', राज कपूर ऋषि कपूर यांना असं का म्हणाले होते?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषि कपूर आज आपल्यामध्ये नाहीत, पण आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात  वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Updated: Sep 4, 2021, 10:56 PM IST
मी तुझा बाप आहे, सेक्रेटरी नाही', राज कपूर ऋषि कपूर यांना असं का म्हणाले होते? title=

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषि कपूर आज आपल्यामध्ये नाहीत, पण आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात  वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज ऋषि कपूर यांचा 69 वा वाढदिवस आहे. ऋषि कपूर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला बालपणात सुरुवात केली. त्यांनी वडील राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' या चित्रपटात काम केलं. यानंतर त्यांनी बॉबी, हिना, अमर अकबर अँथनीसह अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं. ऋषि कपूर यांना चित्रपट जगतात आणणारे त्यांचे वडील राज कपूरच होते.

ऋषि कपूर  यांनी एका मीडियाशी संवाद साधताना सांगितलं  की, त्यांचे वडील त्यांना थेट शिकवायचे की, ''मी तुला लॉन्च केलं आहे, पण तुझी कारकीर्द तुझ्याच हातात आहे''.  ऋषि कपूर म्हणाले की, ''मला खूप अभिमान वाटतो की, मी अशा चित्रपट कुटुंबाशी संबंधित आहे, सिनेमाच्या इतिहासात ज्यांचं मोठं योगदान आहे''. एक किस्सा शेअर करताना  ऋषि कपूर म्हणाले की, ''आज त्यांच्या वडिलांची शिकवण त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आणि तेच त्यांचा मुलगा रणबीर कपूरलाही शिकवतात.''

ऋषि कपूर यांनी शेअर केला किस्सा 
ऋषि कपूर  एका मीडिया वाहिनीशी खास बातचीत करताना म्हणाले, 'लोक मला विचारतात की, मी अभिनय कोठून शिकलो, मी कोणत्याही शाळेत किंवा संस्थेत गेलो आहे का? मी त्यांना नेहमी म्हणायचो की, कपूरपेक्षा मोठी संस्था असू शकत नाही. माझ्या वडिलांनी मला कधीही माझं सेक्रेटरी म्हणून वागवलं नाही आणि माझ्यासाठी कधीही काही ठरवलं नाही.

कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर त्यांचं निधन झालं
ऋषि कपूर  यांचं गेल्या वर्षी 29 एप्रिल रोजी कर्करोगामुळे निधन झालं. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये दोन वर्षे उपचार झाले. शेवटच्या क्षणी, ऋषि कपूर यांना मुंबईच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.