'घरवाली' आणि 'बाहरवाली'मध्ये वाईट प्रकारे फसला रितेश देशमुख, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख अनेक दिवस चित्रपटांपासून दूर आहे.

Updated: Jul 28, 2021, 03:46 PM IST
'घरवाली' आणि 'बाहरवाली'मध्ये वाईट प्रकारे फसला रितेश देशमुख, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख अनेक दिवस चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तरीही सोशल मीडियावर तो कायम अॅक्टिव्ह असतो. कधी व्हिडिओद्वारे तर कधी पोस्टद्वारे तो कायम चाहत्यांसोबत संपर्कात असतो. रितेश देशमुख आपल्या अभिनयाशिवाय कॉमेडीसेन्समुळे देखील ओळखला जातो. रितेश अनेकदा आपले मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो, जे त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. या अनुक्रमे श्रेयसचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

जेनेलिया डिसोझा आणि फराह खान सोबत केला डान्स 
रितेश देशमुखचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला असून त्यात तो पत्नी जेनेलिया डिसूझा आणि चित्रपट दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खानसोबत ‘एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

फराह खानने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना फराह खानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''जेव्हा माझा डार्लिंग रितेश देशमुख आपल्या घरवालीला आमच्या शोमध्ये घेऊन आले. माझे 2  फेवरेट्स". आतापर्यंत 29 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेश देशमुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका वयस्कर व्यक्तीला भेटताना दिसला होता. त्या व्यक्तीने रितेशचा लूक पाहून रितेशला 'तू गुंडासारखा दिसत आहेस' असं म्हणाले. हे ऐकून सुद्धा रितेशने त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि बऱ्याचवेळा त्यांच्याशी हात मिळवला. रितेशच्या या  स्वीट जेस्चरची सोशल मीडियावर खूप कौतुक झालं