श्रेयस तळपदेचं स्मॉल स्क्रीनवर कमबॅक, झी मराठीवरील नवी मालिका

झी मराठीवरील नवी मालिका 

Updated: Jul 28, 2021, 03:25 PM IST
श्रेयस तळपदेचं स्मॉल स्क्रीनवर कमबॅक, झी मराठीवरील नवी मालिका  title=

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर लवकरच कमबॅक करणार आहे. झी मराठीवरील नव्या मालिकेत श्रेयद तळपदे दिसणार आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे खूप वर्षांनंतर मालिकांमध्ये झळकणार आहे. श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आहे. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येत आहे. छोट्या पडद्यावर या नव्या जोडीला प्रेक्षक नक्कीच पसंत करतील यात शंका नाही. 

श्रेयस तळपदे या अगोदर 'झी युवा'वरील 'गुलमोहर' मालिकेत दिसला होता. यावेळी त्याने गिरीजा ओकसोबत स्क्रिन शेअर केली होती. त्याआधी श्रेयसची 'अवंतिका' ही झी मराठीवरील मालिका अतिशय लोकप्रिय ठरली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तसेच बॉलिवूडमध्ये देखील श्रेयसने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं. 'इक्बाल' हा श्रेयसचा पहिला बॉलिवूड सिनेमा. त्यानंतर रोहित शेट्टीच्या सिनेमात श्रेयसने धम्माल केली आहे. 

नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये श्रेयस तळपदे एका लहान मुलीसोबत हॉटेलमध्ये बसला आहे. यामध्ये ती चिमुकली काय म्हणणं आहे?... अशी ही मुलगी सुरूवात करते. श्रेयस तिला मला लग्न करायचंय? असं सांगतो. यावरून ही श्रेयसची मुलगी असेल. यावरून नवीन विषय घेऊन मालिका भेटीला येत असल्याचं कळतंय. 

कोणती मालिका घेणार निरोप? 

झी मराठीवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप गेणार यावर चर्चा रंगली आहे. 'देवमाणूस' नंतर 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.