'माझी बायको, माझं वेड!' जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशची खास पोस्ट

Ritiesh Deshmukh Post on Genelia Deshmukh Birthday: रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सोबत आता चर्चा आहे ती म्हणजे रितेश देशमुखच्या एका पोस्टची. आपल्या लाडक्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 5, 2023, 04:55 PM IST
'माझी बायको, माझं वेड!' जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशची खास पोस्ट title=
August 5, 2023 | ritiesh deshmukh and genelia deshmukh post goes viral on instagram birthday special wishes

Ritiesh Deshmukh Post: रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे कायमच चर्चेत असतात. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे जिनिलिया देशमुख हिची. आज तिचा वाढदिवस आहे. त्यामुळे या तिच्या स्पेशल दिवशी तिच्या आयुष्यातील तिच्या स्पेशल व्यक्तीनं खास शुभेच्छा दिल्या आहेत आणि ही खास व्यक्ती म्हणजे रितेश देशमुख. आधी म्हटल्याप्रमाणे त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यांचे रिल्सही फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आताही त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. आज जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे त्याची एक चांगलीच चर्चा रंगलेली आहे. रितेश आणि जिनिलिया गेली वीस वर्षे एकत्र आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे. यावेळी रितेशच्या इन्टाग्राम पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यातून त्याचे प्रेम पाहून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. 

 ''तू माझी खूप चांगली जिवलग मैत्रीण आहेस, माझ्या कठीण काळात मला कायम साथ देणारी माझी सर्वात चांगली सहकारी आहेस. तू मला कायम प्रोत्साहन दिलेस. My Everything तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझे जीवन सुखी आणि समृद्ध केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार… 'माझी बायको, माझं वेड'…लव्ह यू जिनिलीया!'' असं हटके कॅप्शन त्यानं दिले आहे. त्यामुळे त्याच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. या पोस्टखाली त्यांच्या चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. सोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही त्यावर आपल्या कमेंट्स लिहिल्या आहेत. त्यांच्या फॅन्सना यावेळी त्यांचा हा रोमॅण्टिक फोटो पाहून फार आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पोस्टवर चाहत्यांच्या चांगल्याच चर्चा रंगलेल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या रॉमेण्टिक फोटो आणि कॅप्शन पाहून चाहतेही त्या मुडमध्ये गेले आहेत. 

हेही वाचा - केतकी माटेगावकरचा हटके अंदाज; बोल्ड आणि ब्युटिफूल फोटो पाहून चाहते पडले प्रेमात!

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा एक 'वेड' हा चित्रपट तूफान गाजला होता. या चित्रपटाची क्रेझ तरूणांनामध्ये प्रचंड होती. त्यामुळे त्यांच्या चर्चा रंगेलल्या होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केलेली होती. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आतापर्यंतचा मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेश आणि जिनिलिया आता परत कधी आणि कोणत्या नव्या भुमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. याचीही अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.