रोहित-जुईलीचं पहिलं मॅशअप

आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे दोन तरुण गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर.

Updated: Jul 12, 2018, 09:51 AM IST
रोहित-जुईलीचं पहिलं मॅशअप
फोटो सौजन्य- जुईली जोगळेकर/इंस्टाग्राम

मुंबई : आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे दोन तरुण गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर. अनेक कॉन्सर्ट गाजवल्यानंतर रोहित-जुईलीने प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी सादर केली आहे. आता या दोघांनी एकत्र पार्श्वगायन केलेले गीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. रोहित आणि जुईलीच्या एकत्र गाण्याच्या मागणी करणाऱ्या चाहत्यांची इच्छा आता या मॅशअपमुळे पूर्ण होणार आहे. 

तोळा तोळा-दिल दिया गल्ला हे जुईली-रोहितचे गाणे प्रेक्षकांना नक्कीच सुखावेल. तर तुम्हीही ऐका रोहित-जुईलीच्या आवाजातील हे कर्णमधुर गाणं...

रोहित आणि जुईली सोशल मीडियावरही अत्यंत अॅटीव्ह असतात. अनेकदा चाहत्यांना लाईव्ह भेट देत असतात. अशातच चाहत्यांच्या मागणीतून ही कल्पना आकाराला आली आणि प्रयत्नांनी त्यांनी ती सत्यात उतरली. त्यांच्या या प्रयत्नाला अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनेही व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.