शुल्लक कारणासाठी Rohit Shettyला मागावी लागली होती Kareena Kapoorची माफी

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने आतापर्यंत अनेक चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 

Updated: Apr 27, 2021, 03:52 PM IST
शुल्लक कारणासाठी Rohit Shettyला मागावी लागली होती Kareena Kapoorची माफी

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने आतापर्यंत अनेक चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फक्त सोशल मीडियावरचं नाही तर खऱ्या आयुष्यात देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. करीनाने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जेव्हा करीना आणि रोहित 'गोलमाल 3' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका सिंगिंग शोमध्ये उपस्थित होते. तेव्हा असं काही झालं की, एका शिल्लक कारणामुळे  रोहित शेट्टीला करीनाची माफी मागावी लागली. 

शोमध्ये एका निवेदकाने एका वृद्ध व्यक्तीला व्हीलचेअरवर आणलं आणि सांगितलं की यांनी करीना कपूरचे आजोबा राज कपूर यांच्यासोबत काम केलं. सांगायचं झालं तर रामप्रसाद गोयंका यांनी राज कपूर यांच्यासोबत टेक्नीशियन म्हणून काम केलं. दोघांनी 'आग' चित्रपट ते  'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटापर्यंत एकत्र काम केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor)

 रामप्रसाद गोयंका यांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे करीनाच्या हस्ते त्यांना 8 लाखांचा चेक देण्यात आला. देक दिल्यानंतर व्हीलचेअर बसलेला व्यक्ती उठला आणि वृद्ध इसमाचं केललं मेकअप काढू लागला. दृष्य पाहून करीनासोबत अभिनेता अजय देवगन देखील हैराण झाला. व्हीलचेअरवर बसलेला व्यक्ती दुसरा तिसरा कोणीनसून  कॉमेडियन व्रजेश हीरजी होता. 

परिस्थिती लक्षात येता करीना व्रजेशला मारण्यासाठी धावू लागली. तेव्हा  रोहित शेट्टी उठला आणि म्हणाला मला मला माफ कर हा फक्त एक प्रेंक  होता. करीनाने रोहितला माफ केलं. त्यानंतर करीना म्हणाली 'बरं झालं व्रजेशच्या पाया पडली नाही, मा तर चेक देवून पाया पडणार होती.'