रोहित शेट्टीचा रणवीर सिंगला ईशारा, धमकी देत म्हणाला...

रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा सूर्यवंशी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Oct 26, 2021, 08:28 PM IST
रोहित शेट्टीचा रणवीर सिंगला ईशारा, धमकी देत म्हणाला...

मुंबई : रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा सूर्यवंशी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगन, रणवीर सिंह आणि कतरिना कैफ मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं प्रमोशनसाठी रोहित शेट्टी रणवीर सिंहच्या सेटवर पोहचला. 

रोहित शेट्टीचा सिनेमा 'सूर्यवंशी' दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमाघरात रिलीज होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगन, रणवीर सिंह आणि कतरिना कैफ मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. रोहित शेट्टी आणि त्याची टीम सिनेमाचं प्रमोशनदेखील करत आहेत. सिनेमाचं प्रमोशनसाठी ब्लॉकबस्टर दिग्दर्शक रोहित शेट्टी आता रणवीर सिंहच्या शोमध्ये 'द बिग पिक्चर'मध्ये पोहचला आहे. या शोचा फॉर्मेट आहे की, यामध्ये फोटो पाहून प्रश्न विचारले जातात. नुकताच याचा एक प्रोमो आऊट झालाय ज्यामध्ये रोहित शेट्टी मस्करीत रणवीर सिंहला रोल कट करेन अशी धमकी देताना दिसतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, रोहित शेट्टीला रणवीर एक प्रश्न विचारतो मात्र रोहित शेट्टी यामध्ये रणवीर सिंहची मदत मागतो. यावर रणवीर साफ नकार देतो. आणि म्हणतो, मी तुला काहीच सांगू शकत नाही. यांवर रोहित म्हणतो सिनेमा रिलीज व्हायला अजून बराच वेळ आहे. आणि तुझा रोल कट करेन असा ईशारा रोहित रणवीरला करतो. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

रणवीर सिंहच्या या शोमध्ये रोहित शेट्टी एंटरटेंन्मेंटचा तडका लावायला येणार आहे. रोहित शेट्टीचा सुर्यवंशी बऱ्यांच दिवसांपासून रिलीजसाठी तयार आहे. मात्र कोरनामुळे सिनेमागृह सगळीकडेच बंद होते. आणि आता सिनेमागृह सगळीकडे सुरु झाल्यानंतर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.