अभिनय सोडून हे काम करतेय Rubina Dilaik,पाहा व्हिडिओ

रुबीना दिलैक ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. 

Updated: Oct 30, 2021, 04:14 PM IST
अभिनय सोडून हे काम करतेय Rubina Dilaik,पाहा व्हिडिओ   title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ती तिच्या हिमाचलच्या घरावर किती प्रेम करते, हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कळतं. अभिनेत्री हिमाचलच्या घरातील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच ती चुलीवर जेवणही बनवताना दिसली.

रुबीनाने चुलीवर बनवलं जेवण 
रुबीना दिलैक ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. जिच्या प्रत्येक अभिनयावर चाहत्यांनी भरपूर प्रेम केलं आहे. रुबिनाने 'बिग बॉस 14' जिंकून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. तिला आज सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोकं फॉलो करतात. ज्यांच्यासाठी अभिनेत्री दररोज तिचे नवीन फोटो शेअर करत असते. रुबिनाने तिचे काही नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जे पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. खरं तर हे फोटो आणि व्हिडिओमध्ये रुबिना तिच्या आईसोबत स्वयंपाक करताना दिसत आहे.

चाहत्यांना रुबीनाचा अंदाज आवडला
रुबिना दिलैक तिच्या मूळ गावी हिमाचलमध्ये आहे आणि तिथून तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुबिनाची आई स्वयंपाक करताना दिसत आहे आणि अभिनेत्री तिच्या शेजारी बसलेली दिसत आहे. हे शेअर करताना रुबिनाने कॅप्शन दिलं आहे की, 'मित्रांनो: तुम्ही वीकेंडला काय करत आहात? मी: ????'.'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रुबिनाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे आणि तिच्या मित्रांच्याही यावर खूप कमेंट्स येत आहेत. या पोस्टवर कमेंट करत टीव्ही अभिनेत्री कीर्ती केळकरने लिहिलं, 'पुढच्या वीकेंडला केलं असतंस. दिवाळीत तुझी आठवण येईल.