'या' चित्रपटात ऋचा साकारणार सेक्स वर्करची भूमिका

ऋचा तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागली आहे.

Updated: Sep 26, 2019, 01:09 PM IST
'या' चित्रपटात ऋचा साकारणार सेक्स वर्करची भूमिका title=

मुंबई : 'सेक्शन ३७५' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ऋचा चड्डाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटात तिने एका वकिलाच्या भूमिकेला न्याय दिले आहे. आता ती तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटात ऋचा चक्क एका कमर्शियल सेक्स वर्करची भूमिका साकारताना दिसणार आहे. ब्लॅक कॉमेडी भोवती फिरणाऱ्या या चित्रपटाचे नाव 'अभी तो पार्टी शुरू हुई हैं' असं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

. क्या आप रेट्रो करतें हैं ? या दुनिया से डरतें हैं ? . . .@jacquemus .@driesvannoten . @isabelmarant . Hair @ashisbogi @blendingiscardio . . . . . #Glam #OOTD #ShootLife #Section375

A post shared by Richa Chadha (@therichachadha) on

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी चित्रपाटच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आगामी चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली, 'सध्या मी सर्व प्रकारच्या भूमिका करत आहे. आता मी अनुभव सिन्हा यांच्यासोबत एका ब्लॅ कॉमेडीमध्ये झळकणार आहे.'

'अभी तो पार्टी शुरू हुई हैं' चित्रपटात ऋचा 'सोफी' ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटानंतर ती अश्विनी अय्यर तिवारी यांच्या 'पंगा' चित्रपटात देखील झळकणार आहे.