Narendra Modi : विरोधकांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली; PM मोदींचे INDIA आघाडीच्या नेत्यांना एका वाक्यात उत्तर

देशभरात भाजप विजयाचा जल्लोष साजरा करत आहे. PM मोदींनी देशवासियांचे आभार मानले.  

वनिता कांबळे | Updated: Jun 4, 2024, 09:15 PM IST
Narendra Modi : विरोधकांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली; PM मोदींचे  INDIA आघाडीच्या नेत्यांना एका वाक्यात उत्तर  title=

PM Modi Election Results Speech Lok Sabha Election Results 2024 Live : देशात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये काँटे की टक्कर पहायाल मिळाली. एनडीए 296 तर इंडिया आघाडी 229 जागांवर आघाडीवर आहे. संपूर्ण देशभराची आकडेवारी पहाली असता तब्बल 240 पेक्षा अधिक जगां भाजपने जिंकल्या आहेत.  एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी निवडणुक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच देशवासियांचे आभार मानले. 

लोकसभा निकालानंतर  इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विरोधकांनी एकजूट होऊनही जितक्या जागा जिंकल्या नाहीत तितक्या जागा भाजने एकट्याने जिंकल्या आहेत असं म्हणत PM मोदींचे  INDIA आघाडीच्या नेत्यांचे तोंज बंद केले आहे. आंध्रप्रदेश, ओडिशा, सिक्कीमसह अनेक राज्यात काँग्रेसचा सापडासुप झाला आहे. अनेक उमदवारांचे डिपॉझिट देखील धोक्यात आले आहे. ओडिशात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. भाजपने केरळातही विजय मिळवला आहे. तेलंगणामध्ये भाजपचा आकडा दुपटीने वाढला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल अशा अनेक राज्यांमध्ये भाजपने क्लीनस्वीप केला आहे. सलग तिसऱ्यांदा जनतेने आम्हाला निवडले आहे.  माझ्या आईच्या गेल्यानंतर ही माझी पहिली निवडणुक आहे. मात्र, या देशातील माता, भगिणी तसेच महिलांनी मला आईची कमी जाणवू दिली नाही. देशभरातील महिलांनी मला पाठिंबा दिला.