अखेर बहुप्रतिक्षित 'साहो'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

पाहा चित्रपटाचा ट्रेलर...

Updated: Aug 10, 2019, 07:23 PM IST
अखेर बहुप्रतिक्षित 'साहो'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'साहो' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच 'साहो'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या काही वेळातच #SaahoTrailer ट्रेंड होऊ लागला आहे. या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

ट्रेलरमध्ये प्रभारचा लूक जबरदस्त आहेच. शिवाय अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या एक वेगळाच अंदाज दिसत आहे. 'साहो' चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. या छोट्याशा धमाकेदार ट्रेलरमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'साहो'तील सायको सय्या आणि इन्नी सोनी ही दोन गाणीही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. आज चित्रपटाचा ट्रेलर ४ भाषांमध्ये एकत्रच प्रदर्शित करण्यात आला. 

'साहो'तील अॅक्शन सीनसाठी जगभरातील मोठ-मोठ्या अॅक्शन कोरियोग्राफरची मदत घेण्यात आली आहे. 

Saaho Teaser: रिलीज से पहले ही ब्लॉकबस्टर हुई प्रभास और श्रद्धा की 'साहो', देखें धमाकेदार Teaser

येत्या १५ ऑगस्ट रोजी 'साहो' प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, १५ ऑगस्ट याच दिवशी जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'साहो'च्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.

'साहो'चं दिग्दर्शन सुजीथ यांनी केलं आहे. चित्रपटाचं शूटिंग देशाबाहेर आणि देशातील अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचं बजेट जवळपास १५० कोटींच्या घरात आहे. 

रिलीज हुआ 'साहो' का एक्शन पोस्टर! नजर आया श्रद्धा कपूर और प्रभास का दमदार अवतार

'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे. नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता 'बाहुबली'प्रमाणे 'साहो' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.