सचिनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर, पाच दिवसात जोरदार गल्ला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.  पाच दिवसांत ३५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 31, 2017, 11:41 PM IST
सचिनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर, पाच दिवसात जोरदार गल्ला title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.  पाच दिवसांत ३५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन : अ बिलियन ड्रीम्स हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर भाव खात आहे. शुक्रवारी २६ मेला हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर दोन दिवसांत या सिनेमाने १७.६० कोटींची कमाई केली.

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सिनेमाने ८.४० कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ९.२० कोटी कमावले. दोन दिवसांत या सिनेमाने १७.६० कोटी रुपये कमावलेत.  सचिनच्या बिलियन ड्रीम्स सिनेमाने भारतात सर्व भाषांमध्ये मिळून पाच दिवसांत ३५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सचिनचा हा सिनेमा मराठी, हिंदी भाषांसह इतर भाषांमध्ये एकाचवेळी प्रदर्शित करण्यात आलाय. या चित्रपटासाठी सचिन तेंडुलकरला किती पैसे मिळाले याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी सचिनला तब्बल ४० कोटी रुपये मिळाले आहेत. हा चित्रपट भारतात २४०० स्क्रीनवर तर परदेशात ४०० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे.