चिंताजनक : अभिनेत्री रश्मिका मंदानाची तब्येत बिघडली

अभिनेत्री रश्मिका मंदाना सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे. रश्मिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिका नेहमीच तिच्या बद्दलच्या अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Updated: Nov 16, 2023, 07:02 PM IST
चिंताजनक : अभिनेत्री रश्मिका मंदानाची तब्येत बिघडली title=

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे. रश्मिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिका नेहमीच तिच्या बद्दलच्या अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपुर्वी रश्मिकाचा एक डिपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल  झाला होता. ज्यामुळे ती चर्चेत अली होती. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रश्मिका नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊन्टवरुन काही ना काही शेअर करत असते. आता नुकतीच तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी पाहून तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. 

नुकताच रश्मिकाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बेडवर झोपल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, Recovery is important as well... अभिनेत्रीच्या पोस्टवरुन अभिनेत्री आजारी असल्याचं तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. त्यामुळे तिचे चाहते ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना देवाकडे करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, तब्येत खराब आहे वाटते बाईची.. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, आराम कर. तर अजून एकाने लिहीलंय, लवकर बरी हो. त अजून एकाने लिहीलंय, मी देवाकडे प्रार्थना करत आहे. तु लवकर बरी होण्यासाठी. तर अनेकांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन करत हार्ट ईमोजीही शेअर केले आहेत. 

अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. सोशल मीडियावर रश्मिका कायम सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिने तिच्या सोशल मीडिया अकांऊन्ट एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. रश्मिकाने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रश्मिका मंदान्ना  रणबीर कपूर स्टारर 'एनिमल' मध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 11 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर आणि तृप्ती दिमरी सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे.