प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळी’ नाट्यसंहितेस साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

 नाशिकचे रंगकर्मी प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटक

Updated: Aug 27, 2021, 08:55 AM IST
प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळी’ नाट्यसंहितेस साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार title=

मुंबई : साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारासाठी 'देवबाभळी' या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या लेखनासाठी प्राजक्त देशमुख यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा पुरस्कार मानला जातो. 'देवबाभळी' या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. 50 हजार रुपये रोख रक्कम आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्रिसदस्यीय समितीने या पुरस्काराचे काम पाहिले होते. 

या पुरस्कारांच्या निवडीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारसीनंतर साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारासाठी 'देवबाभळी'च्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नाशिकचे रंगकर्मी प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला रंगभूमीवरही चांगला प्रतिसाद मिळाला.

'संगीत देवभाबळी' नाटकाचं वेगळेपणं?

संगीत देवबाभळी नाटकाच्या कथानकाचे सर्वत्रच कौतुक झाले. या नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. त्याचप्रमाणे या नाटकावर प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रेम केलं. या नाटकाच्या पसंतीनंतर नाटकाचं पुस्तकात रुपांतर करण्यात आलं. 'संगीत देवभाबळी' हे नाटक तुकोबांची पत्नी आवली आणि रखुमाई यांच्यातील संवादावर आहे. विठ्ठल आणि तुकोबा यांचं नातं सगळ्यांनाच माहित आहे. पण आवली आणि रखुमाई यांचं वेगळेपणंच या नात्यातील महत्वाचा भाग आहे हे नाटकाने अधोरेखित केलं आहे. फक्त दोन स्त्रीया हे नाटकं सादर करतात. लाईव्ह संगीत हे या संगीत देवभाबळी नाटकाचं वेगळेपण आहे. तुकोबा, विठ्ठल यांची अस्तित्व जाणवतं. 

'संगीत देवभाबळी' नाटकाची कथा 

तुकोबांना शोधत त्यांची पत्नी आवली भटकत असते, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते. तेव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरतो अशी एक वदंता आहे. त्या काट्याच्याच नावाचे हे नाटक विठ्ठलाने आवलीच्या पायातला काटा काढल्यानंतर काय घडले असेल याचा वेध घेते. विठ्ठल काटा काढून थांबत नाही. या जखमेचे निमित्त करून विठ्ठल रखमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवतो. दोन बायका एकत्र आल्या की गोंधळ उडतो; मात्र येथे या दोघी एकमेकींचा आणि पर्यायाने तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा, आस्तिक्याचा वेध घेतात.