मालिकेच्या टीमकडून मानसिक छळ, अभिनेत्रीचा मोठा दावा

युट्युबचॅनेलवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपली व्यथा मांडली.

Updated: Nov 27, 2021, 12:42 PM IST
मालिकेच्या टीमकडून मानसिक छळ, अभिनेत्रीचा मोठा दावा

मुंबई : 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. असं असताना याच मालिकेतील अभिनेत्रीने टीमवर मोठा आरोप केला आहे.

सुर्याच्या आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अन्नपुर्णा विट्ठल यांनी मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. युट्युबचॅनेलवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपली व्यथा मांडली.

काय आहे प्रकरण ?

या मालिकेच्या सेटवर मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे अशी तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वी केली. अभिनेता सुनिल बर्वे, भरत गायकवाड,  विठ्ठल डाकवे तसंच अभिनेत्री किशोरी आंबिये, नंदिता पाटकर या कलाकारांवरही त्यांनी आरोप केले होते. 

सुनील बर्वे यांची प्रतिक्रिया 

अन्नपुर्णा यांच्या आरोपावर सुनील बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, " अन्नपुर्णा आमच्याबद्दल खोटं पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करत आहेत, हेच कळत नाही.

त्यांना मालिका सोडून तीन महिने झाले असताना अचानक त्यांना व्हिडीओ का शेअर करावासा का वाटला, मला माहित नाही. मालिका सोडणं ही त्यांची निवड होती. पण, मालिका सोडल्यानंतर त्यांनी असं का केलं, असे व्हिडीओ का बनवले हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहे."