घटस्फोटानंतर मलायकाकडून एवढ्या कोटी रूपयांच्या पोटगीची मागणी?

अरबाजसोबत घटस्फोटानंतर पोटगीच्या प्रश्नावर का भडकली मलायका?   

Updated: Nov 27, 2021, 12:25 PM IST
घटस्फोटानंतर मलायकाकडून एवढ्या कोटी रूपयांच्या पोटगीची मागणी?

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं ब्रेकअप आणि घटस्फोट होईल, याची काहीचं कल्पना करू शकत नाही. असचं काही झालं अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या नात्याबद्दल. जेव्हा मलायका आणि अरबाजने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दोघांनी 1998 मध्ये थाटामाटात लग्न केले. यानंतर दोघेही अरहान खान नावाच्या मुलाचे आई-वडील झाले.

पण त्यांचं नातं शेवटपर्यंत टिकू शकलं नाही. 2016 मध्ये, अरबाज आणि मलायका यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या आणि अखेर दोघांनीही जाहीर केले की त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 मध्ये दोघांच्या घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी मिळाली. अखेर त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. 

अर्जुन कपूर मागोमाग अभिनेत्री मलायका अरोराही कोरोना पॉझिटिव्ह

घटस्फोटानंतर अरबाजने मलायकाला पोटगी म्हणून 15 कोटी रुपये दिल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मलायकाने 10 कोटी रुपये मागितले होते, पण अरबाजने तिला 15 कोटी रुपये दिले होते, असेही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले. मलायकाने या सर्व फक्त अफवा असल्याचं म्हटलं. यावरून स्पष्ट होतं की मलायकाने अरबाजकडून पोटगीमध्ये काहीही घेतलं नाही. 

अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका मुंबईत एका नवीन घरात राहायला गेली. ज्यामध्ये ती मुलगा अरहानसोबत राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे. 

अरहान यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये शिकण्यासाठी परदेशात गेला, त्यामुळे मलायका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहते. अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, त्यामुळे त्याला मलायकाच्या घरी अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे.