साई पल्लवीच्या लग्नाचे फोटो व्हायरल? पतीला पाहून सारे थक्क

तिच्यासोबतचा 'तो' कोण? 

Updated: Dec 23, 2021, 10:56 AM IST
साई पल्लवीच्या लग्नाचे फोटो व्हायरल? पतीला पाहून सारे थक्क  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडपासून ते अगदी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत लग्नसराईचेच वारे वाहताना दिसत आहेत. यामध्येच आता सर्वंच्या भुवया उंचावणारे काही फोटो समोर येत आहेत. 

जेव्हा फोटोच सारंकाही बोलून जातात अशा आशयाचं एक कॅप्शन अभिनेत्री साई पल्लवीनं तिच्या सोशल मीडिया पोस्टला दिलं आहे. 

पोस्टमध्ये साईनं काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहताना साईवर आणि तिच्यासोबतच्या व्यक्तीवर सर्वांच्याच नजरा खिळत आहेत. 

कारण, इथं साई पल्लवी लग्नमंडपात उभी राहिलेली दिसत आहे. लग्नविधी सुरु असतानाचे हे फोटो पाहताना साईच्या चेहऱ्यावरेच भाव खूप काही सांगून जात आहेत. 

ज्या क्षणी तिनं हे फोटो पोस्ट केले, तेव्हापासूनच अरेच्छा साईचं लग्न झालं? हाच प्रश्न काही चाहत्यांनी उपस्थित केला. 

पण, मुळात तसं नाहीये. कारण, हे फोटो आहेत साईच्या 'श्याम सिंह रॉय' या नव्या चित्रपटातील. 

राहुल सुकिर्तयन दिग्दर्शित या चित्रपटामधील फोटोमध्ये अभिनेता नानी, साई पल्लवीच्या कपाळी कुंकू लावताना दिसत आहे. 

चित्रपटामध्ये साई एका देवदासीच्या रुपात झळकत आहे. तर, नानी एका स्फोटक लेखकाच्या रुपात दिसत आहे. 

24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटामध्ये 1960 मधील कोलकाता आणि तो काळ दाखवण्यात आला आहे. 

मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड अशा भाषांमध्ये हा चित्रपट झळकणार आहे.