Bas Bai Bas : 'मी हार्ट ब्रोकन झाले...', सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 12, 2022, 11:55 AM IST
Bas Bai Bas : 'मी हार्ट ब्रोकन झाले...', सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत title=

मुंबई : झी मराठी’वर असलेला ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas) हा कार्यक्रमचा लाखो प्रेक्षक आहेत. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) हजेरी लावली आहे. यावेळी सईनं तिला मिळालेल्या रिजेक्शनची आठवण सांगितली आहे. 

आणखी वाचा : Good News: रजनीकांत यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन

कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडचा प्रोमो हा झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी सई म्हणाली, 'एका चित्रपटासाठी माझं सिलेक्शन झालं होतं. मात्र, शूटच्या एक दिवस आधी मला सांगितलं की तू आता हा चित्रपट करत नाहीयेस. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मी हार्ट ब्रोकन झाले होते. माझा कॉन्फिडन्स लो झाला होता. पण मला वाटतं जेव्हा असं काही होतं तेव्हाच माणून पेटून उभा राहतो आणि त्यातून काहीतरी छान घडतं.'

आणखी वाचा : अबब ! 10 वर्षे हनीमूनवर निघालेलं जोडपं जगतंय 'या' गोष्टीवर, कारण वाचून व्हाल हैराण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : राखी सावंतच्या 'तसल्या' कपड्यांवर बॉयफ्रेंड आदिल संतापला, अभिनेत्रीला वाटते भीती?

सईनं सांगितलेला हा किस्सा ऐकल्यानंतर सुबोध भावेनं तिला विचारलं की त्यांनी काय कारण दिलं होतं. त्यावर हसून सई म्हणाली, तू चकणी आहेस. हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच हसू लागतात. त्यावर सुबोध बोलतो तो चुकून चकणी म्हणाला असेल, त्याला तू चिकणी दिसतेस असं म्हणायच असेल.' तर सई म्हणाला, तो चकणा असेल म्हणून त्याला मी चकणी दिसली असेल. (sai tamhankar talked about her rejection in bus bai bus show on zee marathi sobodh bhave) 

Miyan Biwi Aur Banana: शॉर्ट फिल्म निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल, भगवान जगन्नाथांवर विनोद केल्याचा आरोप

या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार पंकजा मुंडे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अशा अनेक दिग्गज महिला सहभागी झाल्या आहेत.