सई ताम्हणकरचा पहिला बॉलिवूड सिनेमा तुम्हाला माहितीये का?, अनिल कपूरसोबत केलं होतं काम

Sai Tamhankars Birthday: मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असलेली सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 25, 2024, 01:05 PM IST
सई ताम्हणकरचा पहिला बॉलिवूड सिनेमा तुम्हाला माहितीये का?, अनिल कपूरसोबत केलं होतं काम title=
Sai Tamhankars birthday: Did you know she has acted with anil kapoor in flim black and white

Sai Tamhankars Birthday: मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस आहे. मराठीत अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर आता सई ताम्हणकर हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. मिमि, हंटर, लव्ह सोनिया अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तर, अलीकडेच ती नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या सिनेमात दिसणार आहे. पण तुम्हाला माहितीये का आपल्या मराठमोळ्या सईने बॉलिवूड सुपरस्टार अमिर खान आणि अनिल कपूर यांच्यासोबतही काम केले आहे. जाणून घेऊया सईच्या या चित्रपटांबद्दल. 

बोल्ड, ग्लॅमरस आणि बिनधास्त अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकरने सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल केला होता. या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून सईने सिनेक्षेत्रात करिअरची सुरुवात केली. छोट्या पडद्यावरुन लोकप्रियता मिळाल्यानंतर सईने चित्रपटात नशीब आजमावले. चित्रपटात मुख्य भूमिका मिळण्याआधी सईने अनेक छोट्या छोट्या भूमिकादेखील केल्या आहेत. बॉलिवूडमध्येही सईने आपलं स्थान मजबूत केलं आहे. 

अनिल कपूरचा ब्लॅक अँड व्हाइट हा सिनेमा सईचा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. 2008 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सईने एक छोटीशी भूमिका साकारली आहे. ब्लॉक अँड व्हाइट या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबतच शेफाली शहा, अनुराग सिन्हा, आदिती शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, सईने या चित्रपटात निम्मो ही भूमिका साकारली आहे. सुभाष घई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये सईची छोटीशी भूमिका असली तरी तिने खूप छान पद्धतीने वठवली आहे. 

आमिर खानच्या चित्रपटातही सई झळकलेली

आमिर खानच्या गजनी चित्रपटातही सईने भूमिका साकारली होती. सिनेमात तिने सुनिता (जिया खान)च्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. चित्रपटात जिया खान हिने एक मेडिकल विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. जिया खानला नेहमी सपोर्ट करणाऱ्या खऱ्या मैत्रिणीची भूमिका सईने साकारली होती. 

मात्र सईला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती 2015मध्ये आलेल्या हंटर चित्रपटामुळं. गुलशन देविहा आणि राधिका आपटे यांच्यासोबत सईची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती. ज्योत्सना सुर्वे ही भूमिका सईने साकारली होती. त्याचबरोबर 2018 मध्ये आलेल्या लव्ह सोनिया या चित्रपटात सईने अनुपम खैर यांच्यासोबतही काम केले होते. त्याचबरोबर 2021मध्ये आलेल्या क्रिती सॅनोनसोबतच्या मिमि चित्रपटाही ती झळकली होती.