२३ वर्षांपूर्वी सैफनं स्मृती इरानी यांना दिला होता हा सल्ला...

'क्योंकि सास भी कभी बहू थी' या कार्यक्रमातून स्मृती इराणी यांनी घराघरात 'आदर्श सून' म्हणून ओळख मिळाली होती

Updated: Dec 14, 2018, 03:20 PM IST
२३ वर्षांपूर्वी सैफनं स्मृती इरानी यांना दिला होता हा सल्ला... title=

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या भारतीत सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळ्यात अनेक दिग्गज सहभागी झाले होते... एकीकडे बॉलिवूडचे मंडळी या लग्नात हजेरी लावण्यासाठी उत्सुक होते... तर दुसरीकडे राजकारणातले दिग्गजांनाही या लग्नात सहभागी व्हायचं होतं... याच निमित्तानं माजी अभिनेत्री आणि सद्य भाजप नेत्या स्मृती इराणी या लग्नासाठी दाखल झाल्या... या दरम्यान त्यांची गाठ पडली त्यांच्या एका जुन्या मित्राशी, मार्गदर्शकाशी... त्यांचा हा मार्गदर्शक म्हणजे अभिनेता सैफ अली खान... 

भारत सरकारच्या कापड मंत्री स्मृती इरानी यांनी या कार्यक्रमादरम्यान सैफसोबत एक सेल्फीही घेतला... हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

१९९५ साली स्मृती जेव्हा मुंबईत दाखल झालो होते... तेव्हा सैफनं त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. '२३ वर्षांपूर्वी दिल्लीहून आलेल्या एका नवशिक्याला एका उगवत्या ताऱ्यानं मुंबईत कसे पाय रोवायचे हे सांगितलं होतं... काही अशा टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढू शकता... त्यांना हे माहीत होतं की ही नवशिकी व्यक्ती एक दिवस नक्कीच स्टार बनू शकेल. या आठवणींसाठी सैफ अली खान यांचे आभार' असं त्यांनी हा फोटो शेअर करताना म्हटलंय.  

मुंबईत आल्यानंतर काही दिवसांनीच स्मृती इराणी यांना एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळाली होती. या कार्यक्रमातून स्मृती यांनी घराघरांत 'आदर्श सून' म्हणून ओळख मिळाली होती.