Saif Ali Khan Troll : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हा गेल्या अनेक दिवसांपासून 'आदिपुरूष' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सैफ अली खान हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी देखील पापाराझींमुळे तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. सैफ अली खान त्याच्या घरून निघताना किंवा मग कुठे फिरायला जात असताना पापाराझी त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करतात. सध्या सैफ अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. (Saif Ali Khan Viral Video) इतकंच काय तर नेटकऱ्यांनी त्याची तुलना बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी देखील केली आहे.
सैफ अली खानचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सैफ अली खान कारमधून खाली उतरताना दिसत आहे. सैफ अली खान कारमधून उतरल्यानंतर पापाराझी त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करतात. या व्हिडीओत सैफनं आकाशी रंगाचं टी-शर्ट, निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. या व्हिडीओमध्ये सैफच्या कपड्यांनी नाही तर त्याच्या वाढलेल्या वजनानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
सैफचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाले, घरी बसून जाड झाला. दुसरा नेटकरी म्हणाला, अरे हा तर मलायका अरोरा (Malaika Arora)सारखा चालतोय. तिसरा नेटकरी म्हणाला, याला तर खूप जास्त अॅटिट्यूड आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, काका. दुसरा नेटकरी म्हणाला, ही काय कपडे परिधान केले आहेत. तिसरा नेटकरी म्हणाला, इतक्या सुंदर बेबोनं या कार्टूनशी लग्न केला यावर माझा विश्वास बसत नाही आहे. (Kareena Kapoor Khan)
हेही वाचा : 'मुलांना जन्म देण्याआधी पालकांना Training ची गरज', Twinkle Khanna चं मोठं वक्तव्य
दरम्यान, 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील सैफ अली खानचा लूक पाहून प्रेक्षकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले होते. सैफ अली खाननं या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. सैफ अली खानचा लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांना रावणापेक्षा अलउद्दीन खिलजीसारखा दिसतो असं अनेकांचं मत होते. सैफ अली खानचा लूक आणि खराब VFX मुळे आदिपुरुष चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे काम पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे.