'लव आजकल' चित्रपटावर सैफची प्रतिक्रिया

१४ फेब्रुवारी रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.  

Updated: Jan 19, 2020, 03:42 PM IST
'लव आजकल' चित्रपटावर सैफची प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान स्टारर 'लव आज कल' चित्रपटाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी पूर्णपणे तयार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेम कथे भोवती चित्रपटाचा ट्रेलर फिरताना दिसत आहे. चित्रपटाचा  ट्रेलर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडताना दिसत आहे. 

१४ फेब्रुवारी रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक होत असलं तरी अभिनेता सौफ अली खानला मात्र चित्रपटाचा ट्रेलर फारसा आवडलेला दिसत नाही. 

बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत त्याने लेकीच्या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. ' लव आज कल चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर अधिक चांगला आहे.' असं म्हणत त्याने अप्रत्यक्षरित्या लेकीच्या चित्रपटाचा ट्रेलर पसंतीस न पडल्याचे सांगितलं.

दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'लव आजकल' या आगामी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिक आणि साराला एकत्र काम करण्याची संधी मिळली. दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेत्री सारा खानने तिच्या मनात असलेली गोष्ट सर्वांशी शेअर केली होती.

२००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा 'लव आजकल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपट हीट झाला होता. आता सारा आणि कार्तिकची जोडी पद्यावर काय धमाल करणार ? हे चित्रपट आल्यावर कळेलच. चित्रपटामध्ये त्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे, हे प्रेक्षकांना लवकरचं पाहायला मिळणार आहे.