करिनाआधी या मुलीच्या प्रेमात पडला होता सैफ

बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स हा विषय नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी आवडीचा असतो. अनेक गाजलेल्या अफेअर्समध्ये अभिनेता सैफ अली खान याचाही समावेश आहे. २०१२ मध्ये सैफने पहिली पत्नी अमृता सिंहला घटस्फोट देऊन करिना कपूरसोबत लग्न केलं. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की, करिनासोबत लग्न करण्याआधी सैफ दोन वर्ष एका दुस-याच मुलीच्या प्रेमात होता. सैफ हा इटलीच्या रोजा कॅटलानो या मुलीच्या प्रेमात पडला होता. असे म्हटले जाते की, त्याचं पहिलं लग्न मोडण्यासाठी ही मुलगीच जबाबदार होती.

Updated: Aug 16, 2017, 12:53 PM IST
करिनाआधी या मुलीच्या प्रेमात पडला होता सैफ  title=

मुंबई : बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स हा विषय नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी आवडीचा असतो. अनेक गाजलेल्या अफेअर्समध्ये अभिनेता सैफ अली खान याचाही समावेश आहे. २०१२ मध्ये सैफने पहिली पत्नी अमृता सिंहला घटस्फोट देऊन करिना कपूरसोबत लग्न केलं. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की, करिनासोबत लग्न करण्याआधी सैफ दोन वर्ष एका दुस-याच मुलीच्या प्रेमात होता. सैफ हा इटलीच्या रोजा कॅटलानो या मुलीच्या प्रेमात पडला होता. असे म्हटले जाते की, त्याचं पहिलं लग्न मोडण्यासाठी ही मुलगीच जबाबदार होती.

कोण आहे रोजा जॅटलानो ?

- रोजा कॅटलानो ही एक स्विस मॉडेल असून तिचा जन्म इटलीमध्ये झाला होता. दोन वर्ष तिचं आणि सैफचं नातं होतं. रोजाने ‘शौर्य’ सिनेमात एक आयटम नंबरही केला होता. 

- असेही म्हटले जाते की, रोजा आणि सैफ लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र २००७ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

- एका मुलाखतीत रोजाने सैफच्या बाबतीत धक्कादायक खुलासे केले होते. ती म्हणाली होती की, सैफ ने तिला हे कधीही नव्हतं सांगितलं की, तो विवाहीत आहे.

- जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिला कळालं की, सैफ दुसरीकडेच राहतो आणि त्याचा घटस्फोट झाला असून तो दोन अपत्यांचा पिता आहे.

केनियात झाली होती दोघांची पहिली भेट :

रोजाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची आणि सैफची पहिली भेट केनियामध्ये झाली होती. ती तिथे ६ वर्षांआधी एका सोशल प्रोजेक्टसाठी गेली होती. रोजानुसार, सैफच्या भेटीनंतर तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. 

२००७ पासून करिना आणि सैफचं अफेअर सुरू :

२००७ मध्ये शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिनाची आणि सैफची जवळीक वाढली होती. ‘ओमकारा’ सिनेमात दोघांना फारच कमी सीन एकत्र करायचे होते. तरीही सेट्वर दोघेही एकत्र दिसत होते. ओमकारानंतर त्यांनी ‘टशन’साठी एकत्र काम केलं. तेव्हा तर हे दोघे अधिकच जवळ आले होते. दोघांच्याही अफेअरच्या गॉसिप्स सुरू झाल्या होत्या. लॅक्मे फॅशन विकमध्ये ही जोडी पहिल्यांदा समोर आली आणि तेव्हा सैफने ते डेट करत असल्याचे पहिल्यांदा मान्य केले. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.

ऑक्टोबर १९९१ मध्ये सैफ आणि अमृताचं लग्न झालं तेव्हा सैफ केवळ २१ वर्षांचा होता. तेव्हा त्याचं करिअरही सुरू झालं नव्हतं. मीडिया रिपोर्टनुसार, सैफचे घरातील लोक या लग्नाच्या विरोधात होते. त्यामुळे सैफ लग्नानंतर बराच काळ अमृताच्याच घरी राहत होता. दोघांना सारा आणि इब्राहिम ही अपत्ये झाली. सैफ आणि अमॄता १३ वर्षापर्यंत ऎकमेकांसोबत होते. २००४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.