शाहरूख खानने घेतली दिलीप कुमारजींची भेट !

लीलावती रुग्णालयातून घरी परतलेल्या दिलीप कुमार यांची भेट घेण्यासाठी शाहरूख खान काल संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी पोहचला.

Updated: Aug 16, 2017, 12:10 PM IST
शाहरूख खानने घेतली दिलीप कुमारजींची भेट !   title=
bollywoodlife.com

मुंबई : लीलावती रुग्णालयातून घरी परतलेल्या दिलीप कुमार यांची भेट घेण्यासाठी शाहरूख खान काल संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी पोहचला.

दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांनी या प्रसंगाची माहिती ट्विटरवरून दिली आहे. 

 

दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅन्डलवर सायरा बानू यांनी खास संदेश आणि फोटो ट्वीट केला आहे. त्यानुसार, ' आज  साहेबांचा मानलेला मुलगा शाहरूख त्यांना भेटायला आला होता.  रुग्णालयातून परतल्यानंतर (दिलीप) साहेबांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. आम्ही देवाचे आभारी आहोत. '  

 

शाहरूख सोबतच त्याची मुलगी सुहानादेखील भेटीदरम्यान होती.  ९४ वर्षीय दिलीपकुमार यांना किडनीचा त्रास आणि डीहायाड्रेशन झाल्याने काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा पाहता २ ऑगस्टला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.