Saina Movie Review: देशातल्या प्रत्येक लेकीला प्रोत्साहित करणारी 'सायना'

आताच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला त्यांची मोलाची भुमिका बजावत आहे.

Updated: Mar 26, 2021, 03:20 PM IST
Saina Movie Review: देशातल्या प्रत्येक लेकीला प्रोत्साहित  करणारी 'सायना'  title=

सिनेमा  : सायना
कलाकार : परिणीती चोप्रा, मेघना मलिक, नायशा कौर भटोए, मानव कौल, ईशान नवकी, शुभ्रज्योती बारत 
दिग्दर्शक : अमोल गुप्ते

आताच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला त्यांची मोलाची भुमिका बजावत आहे. एवढचं नाही तर इच्छा, मेहनत, आवडीच्या जोरावर महिलांनी त्यांच्या क्षेत्रात स्वतःचं नाव देखील मोठं करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अशा कर्तृत्ववान महिलांची कामगिरी देशातील इतर लेकींना प्रोत्साहित करते.  आज प्रदर्शित झालेल्या 'सायना' सिनेमा बॅटमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात सायनाच्या भुमिकेला अभिनेत्री परिणीती चोप्राने योग्य न्याय दिला आहे. 

हिसार तालुक्यात राहणाऱ्या ऊषा राणी आणि हरवीर सिंह नेहवाल यांची प्रतिभावान कन्या सायना नेहवालने 2015 साली बॅटमिंटन विश्वात देशाचं नाव मोठं केलं. 2015 साली बॅटमिंटनमध्ये पहिला रँक मिळवणारी सायना भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर पुरूषांमध्ये हा मान मिळवला आहे प्रकाश पादुकोणने.  

सिनेमात मध्यमवर्गीय कुटुंबातील सायनाच्या प्रवासाबद्दली कथा दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी उत्तम रित्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बदली झाल्यामुळे हैदराबादमध्ये आलेले सायनाचे वडील आणि आई दोघेही बॅटमिंटन खेळडू होते. त्यामुळे आपल्यामुलीने देशासाठी खेळावं  अशी सायनाच्या आई इच्छा आणि ती इच्छा सायनाने पूर्ण देखील केली. 
 
अंडर 12 मध्ये जेव्हा सायना राष्ट्रीय क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर आली तेव्हा आईने तिला चापट मारली.  तेव्हा सायानाचं वडील तिचं सांत्वन करतात आणि सायनाला पटवून देतात की विजय तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. त्यादिवसापासून सायना मनापासून खेळते तिच्या प्रवासात तिच्या कोचचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. 

त्यानंतर सायनाची आई यशात-अपयशात कायम तिच्या सोबत राहते. या प्रवासात सायनाला मैदानाबाहेर देखील राहावं लागतं. कोचसोबत काही मतभेद झाल्यामुळे सायना हताश होते. 'शक को अपने मन में घर मत बनाने दे। शेरनी है तू। साइना नेहवाल है तेरा नाम...' अमितोष नागपाल द्वारा लिखीत आईच्या या वाक्यामुळे सायनाला आणखी प्रेरणा मिळते. 

सिनेमात सायनाच्या प्रवासाबद्दल तिच्या संघर्षाबद्दल, विजयाबद्दल सर्वकाही उत्तम रित्या मांडण्यात आलं आहे. पण दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी वादग्रस्त भाग टाळतं सायनाच्या प्रेमप्रकरणावर देखील प्रकाश टाकला आहे. सिनेमात अमोल गुप्ते यांना अमाल मलिक यांच्या संगीताची साथ मिळाली आहे. त्यामुळे सिनेमा अधिक बहराल आहे. 

सिनेमात सायनाच्या प्रियकराची भुमिका ईशान नवकीने उत्तम रित्या साकारली आहे. सायनाच्या बॉयफ्रेंडचं नाव परुपल्ली कश्यप असून तो देखील माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहे. सिनेमा सर्वांना प्रेरित करेल असाचं आहे.