सैराट फेम रिंकू राजगुरु प्रेमात? बॉयफ्रेंडबाबत केला खुलासा

मराठी चित्रपट 'सैराट' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूंच्या प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं. 

Updated: Jan 30, 2023, 06:34 PM IST
सैराट फेम रिंकू राजगुरु प्रेमात? बॉयफ्रेंडबाबत केला खुलासा title=

मुंबई : सैराट (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सोशल मीडियावर कमालीची चर्चेत असते.. आर्चीने आपल्या दमदार अभिनयाने तर प्रेक्षकांना वेड लावलं आहेच, पण तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट देखील सगळ्यांचच लक्षवेधून घेणाऱ्या असतात. आर्चीला साड्यांची विशेष आवड आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल रिंकूला साडी नेसायला प्रचंड आवडतं. रिंकू चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

मराठी चित्रपट 'सैराट' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूंच्या प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं. यातील गाण्यांची आजही भुरळ प्रेक्षकांना पडत आहे.  अजूनही या चित्रपटाची क्रेझ आर्चीच्या चाहत्यांमध्ये कायम आहे. या चित्रपटातील कलाकारांनाही प्रेक्षकांची अमाप पसंती मिळाली. मात्र आर्चीने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती प्रचंड चर्चेत आहे. आर्चीने आता आपल्या बॉयफ्रेंडबाबत एक खुलासा केला आहे.

सैराटमधून एक ग्रामीण भागातील तरुण व तरुणीच्या प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावलं. यातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिला अनेक चित्रपटाच्या व वेब्सिरीजच्या ऑफरही आल्या. शिवाय तिने त्यामध्ये कामही केलं. आता ती पुन्हा एका कारणाने चर्चेत आली आहे. तिने एका  दिलेल्या मुलाखतीत आपल्या बॉय फ्रेंडबाबत एक खुलासा केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी रिंकूने बॉयफ्रेन्डबाबत म्हंटलं आहे की, अजूनतरी माझ्या आयुष्यात कोणता मुलगा नाही. ज्या दिवशी माझ्या आयुष्यात कोणी येईल, त्या दिवशी मी जाहीर करेन. त्यात लपवण्यासारखं काय आहे. रिंकूच्या या वक्तव्यानंतर आता परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि रिंकूनं खऱ्या आयुष्यातही एकत्र यावं, अशी इच्छा नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. रिंकू आणि आकाशने सैराट आणि झुंड सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली आहे