बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकाचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated: Apr 28, 2022, 06:43 PM IST
बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकाचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा title=

मुंबई : हिंदी चित्रपटांतील खलनायकी भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सलीम घोष यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवार, २८ एप्रिल रोजी सकाळी सलीम यांचं निधन झालं. सलीम यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फॅमिली मॅन अभिनेता शारीब हाश्मीने पोस्ट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांचे फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सलीम घोष यांच्या निधनावर शारीब हाश्मी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, मी पहिल्यांदा सलीम घोष साहेबांना टीव्ही सीरियल 'सुबह'मध्ये पाहिलं. त्याचं काम अप्रतिम होतं आणि त्यांचा आवाज मनमोहक होता. सलीम घोष 'मंथन', 'कलयुग', 'चक्र', 'सारांश', 'मोहन जोशी हाजीर हो', 'त्रिकल', 'आघात', 'द्रोही' यांसारख्या चित्रपटांचा भाग राहिले आहेत.

सलीम घोष हे केवळ चित्रपटच नाही तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहेत. श्याम बेनेगल यांच्या 'भारत एक खोज' या टीव्ही मालिकेत त्यांनी राम, कृष्ण आणि टिपू सुलतानच्या भूमिका साकारल्या होत्या. ते सिटकॉम वागले की दुनिया (1988) चा देखील एक भाग होते. 'किम', 'द परफेक्ट मर्डर', 'द डिसीव्हर्स', 'द महाराजाज डॉटर' आणि 'गेटिंग पर्सनल' यासोबत गॉससोबतच्या काही आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचाही सलीम भाग होता.

सलीम घोष हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहेत. त्यांनी अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम केलं. सलीम घोष यांनी 1978 मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली. स्वर्ग नरक या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर ते चरखा, सरांश आणि मोहन जोशी जहिर हो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले.