'भारतीय मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची गरज जास्त'

अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

Updated: Nov 10, 2019, 06:33 PM IST
'भारतीय मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची गरज जास्त' title=

मुंबई : कित्येक वर्षांपासून अयोध्येतील सुरू असलेला वाद अखेर विकोपास आला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर अनेक कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@beingsalmankhan @arbaazkhanofficial @sohailkhanofficial @arpitakhansharma @aaysharma @malaikaarorakhanofficial @seemakhan76 @amuaroraofficial @atulreellife @nirvankhan15 @iamarhaankhan

A post shared by Salim Khan (@salim_khan1935) on

तर 'भारतातील मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची जास्त गरज आहे. त्यामुळेल अयोध्येत मिळणाऱ्या पाच  एकर जमिनीवर शाळा उभारावी' असं मत ज्येष्ठ लेखक, निर्माते सलीम खान यांनी मांडले आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

'मुस्लिमांनी या संदर्भात अधिक चर्चा करायला नको आहे. मुस्लिमांनी आता आपल्या मुलभूत समस्यांवर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपल्याला चांगल्या शाळा आणि रूग्णालयांची गरज आहे. ५ एकर जमीन  मशिद तयार करण्यात येणार आहे, तर त्याजागी शाळा आणि रूग्णालये तयार करण्यात यावी.' असं मत सलीम खान यांनी व्यक्त केलं आहे.