Salim Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सतत धमकी मिळत असलेल्या धमक्यांमध्ये त्याचे वडील आणि लेख सलीम खान यांनी एक मुलाखत दिली आहे. ज्यात त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपासून काळवीटच्या शिकार प्रकरणावर स्पष्टपणे वक्तव्य केलं आणि अनेक दावे हे फेटाळून लावले. त्यांनी म्हटलं की त्यांची मुलानं तर झुरळाला देखील मारलं नाही. तो प्राण्यांवर प्रेम करतो. तर ती माफी का मागणार. उगाच, एक निष्पाप व्यक्ती माफी का मागणार?
सलीम खान यांनी 'ABP न्यूज' ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सलमान खानविषयी त्यांचं स्वत:ची बाजू मांडली आहे. ज्यात सांगितलं आहे की बाबा सिद्दीकीची हत्या त्यामुळे झाली कारण त्यांचे सलमान खानसोबत चांगले संबंध होते. त्यामुळे स्क्रीनराइटरनं सांगितलं की कुटुंब, सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत कोणताही संबंध नाही. कुटुंबाचं म्हणणं आहे की जरी लॉरेंस बिश्नोई बाबा सिद्दीकीच्या हत्येत सहभाग असला तरी त्याचा सलमान खानशी काहीही संबंध नाही. हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याप्रमाणे, हे प्रकरण प्रॉपर्टी वादावरून सुरु झाला होता.
Salman wasn't present during the blackbuck incident, he wasn’t even in the car. He loves animals and has always been against hunting - Salim Khan Sir #SalmanKhan #Sikandar pic.twitter.com/o9W6WBcHXR
— (@katarsalmanfan) October 18, 2024
काळवीट शिकार प्रकरणात सलीम खान यांनी वक्तव्य केलं की 'हे प्रकरण समोर आल्यानंतर सलमान खानला विचारलं देखील होतं, ना मी कोणत्या प्राण्याला मारलं. ना सलमाननं कोणत्या प्राण्याची हत्या केली. आम्ही कधीच कॉकरोचला मारलं नाही. आम्ही या सगळ्यावर विश्वास ठेवत नाही. मी सलमान खानला विचारलं की हे कोणी केलं, तर त्यानं सांगितलं की तो त्यावेळी तिथे उपस्थितच नव्हता. त्यानं सांगितलं की जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो गाडीत सुद्धा नव्हता आणि तो मला कधीच खोटं सांगत नाही. आम्ही तर बंदूकसुद्धा वापरत नाही.'
सलीम खाननं सांगितलं की 'प्राण्यांची हत्या करण्याचे शौक त्याला नाही. प्राण्यांवर त्याचं खूप प्रेम आहे. त्याला सतत मिळणाऱ्या जीव घेण्या धमकीवर ते म्हणाले, आयुष्य आणि मृत्यू, हे देवाच्या हातात आहे. हे कुराण शरीफमध्ये होतं, इज्जत, जिल्लत, जिंदगी और मौत ये मेरे हाथ में है।' (आदर, अपमान, आयुष्य आणि मृत्यू या गोष्टी माझ्या हातात आहेत.)'
त्यांनी लॉरेन्स बिष्णोईविषयी सांगितलं की 'जर जिवंत राहणं आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी त्याच्या हातात आहेत तर पाहूया आणि मागा. अरे कोणाची माफी मागायची. माफी त्याची मागतात ज्याच्यासोबत काही चुकीचं झालं आहे. चर्चमध्ये देखील जेव्हा कोणती गोष्ट मान्य करतो तर तेव्हा त्याला करतात ज्याला आपण धोका दिलाय की सर मी तुम्हाला धोका दिला. तुमचं मन दुखावलं. तुम्हाला त्रास दिला. तुमची माफी मागतो. कोणतीही चूक मान्य करणं देखील हेच असतं.'
हेही वाचा : '...अन् मग मी अखेरचा श्वास घेईन'; शाहरुख खाननं का केली सेटवर मरण्याची गोष्ट?
सलीम खान यांनी पुढे सांगितलं की 'पोलिसांनी आम्हाला घरातील काही काही ठिकाणी बसू नका असं सांगितलं आहे. जिथे ते आधी बसायचे कारण म्हणजे त्याच्यापैकी एका ठिकाणी गोळी झाडण्यात आली होती. तर 5 कोटी मागणाऱ्याविषयी ते म्हणाले, आता फळांची मागणी वाढली आहे की 5 कोटी द्या. आम्ही माफ करुन. तर आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं की हे एक्सटॉर्शनचं प्रकरण आहे.'