'...अन् मग मी अखेरचा श्वास घेईन'; शाहरुख खाननं का केली सेटवर मरण्याची गोष्ट?

Shah Rukh khan Want To Die Film : शाहरुख खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Oct 19, 2024, 11:23 AM IST
'...अन् मग मी अखेरचा श्वास घेईन'; शाहरुख खाननं का केली सेटवर मरण्याची गोष्ट?  title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh khan Want To Die Film : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. शाहरुख खानचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. शाहरुखला या यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं की शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार आणि त्याची इच्छा आहे की त्यानं त्याचा शेवटचा श्वास हा चित्रपटाच्या सेटवरच घ्यायला हवा. शाहरुखनं हे मान्य केलं की अभिनयाच्या माध्यमातून तो त्याचं आयुष्य खूप एन्जॉय करतो आणि त्याला लोकांचं मनोरंजन करायला खूप आवडतं. 

शाहरुख खाननं ही मुलाखत लोकार्नो फिल्म फेस्टिवलच्या यूट्यूब चॅननला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं त्याचे विचार आणि भविष्यातील प्लॅनिंगविषयी देखील सांगितलं आहे. याच फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरुखला लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलं. मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की 'त्याला कायम अभिनया करायचा आहे का?' शाहरुख खान म्हणाला, 'मला कायम अभिनय करायचा आहे का? तर हो, जोपर्यंत मी शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत मला अभिनय करायचा आहे, माझ्या आयुष्यात एकच स्वप्न आहे की कोणी अॅक्शन म्हणेल आणि मग मी अखेरचा श्वास घेईन. ते कट म्हणतील आणि त्यानंतरही मी उठत नाही. आता हे संपल, प्लीज. मी म्हणतो, नाही. जोपर्यंत ते सगळे बोलत नाही की सीन अगदी योग्य झाला आहे. हो मला कायम अभिनय करायचा आहे.'

हेही वाचा : आई शीख, वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लिम, पत्नी हिंदू... तुम्ही ओळखलंत 'या' अभिनेत्याला?

शाहरुख खाननं सांगितलं की 'जसं लोकं समजतात, तसा तो गंभीर अभिनेता नाही. त्यानं सांगितलं की जर मी दोन मिनिटांसाठी मनोरंजन करू शकतो, तर हे प्रेम आहे. जर मी कोणाला 50 वर्ष प्रेम करु शकतो तर हे मनोरंजन आहे. जर मी कोणाचं 30 सेकंदासाठी मनोरंजन करु शकतो तर ही क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे मी एकाच गोष्टीसाठी वेगवेगळी नाव शोधत असतो आणि मला हा आनंद शेअर करण्यास खूप मज्जा येते. ज्यामुळे लोकानं एक तास किंवा त्यापैकी जास्त वेळ त्या गोष्टीची आठवण राहते आणि ते त्याचा आनंद घेतात.'