मुंबई : सलमान खान बॉलिवूडचा असा एक अभिनेता आहे. जो भरपूर संपत्ती असूनही आपल्या संपूर्ण कुटुंबासह एकाच घरात राहतो. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये तो खूप लाडका आहे. त्याचबरोबर सलमान त्याच्या वडिलांचा खूप आदर करतो. मात्र, एकदा सलमानने वडील सलीम खान यांचे पैसे जाळले होते. आज आम्ही तुम्हाला या विषयीच सांगणार आहोत.
सलमानच्या लहानपणीचा किस्सा
हा किस्सा सलमान खानच्या लहानपणीचा आहे. जेव्हा तो इंदूरमध्ये राहत होता. एकदा दिवाळीच्या निमित्ताने इतर मुलांसोबत भाईजान पेपर जाळून दिवाळीचा आनंद लुटत होता. दरम्यान, पेपर संपल्याने त्याने घरात जाऊन वडिलांचे पैसे आणले आणि ते जाळून टाकले. त्यावेळी सलीम खानच्या पगारातले हे पैसे 750 रुपये होते.
सलीम खानने दिली होती अशी रिएक्शन
त्याचवेळी सलीम खानला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी सलमानसह सर्व मुलांना बोलावून पैशाचं महत्त्व सांगितलं. यानंतर सलमानला त्यांचा मुद्दा समजला आणि त्याने पुन्हा असं कधीही न करणार असं सांगितलं.
सलमान खानच्या बालपणीच्या या किस्स्यांचा उल्लेख संजुक्ता नंदीच्या 'खंटास्टिक: द अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलीवूड ट्राय' या पुस्तकात करण्यात आला होता.