सलमान खान, रजनीकांत, श्रीदेवी यांचा 'हा' फोटो व्हायरल

सोशल मीडियावर श्रीदेवींचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. 

Updated: Feb 9, 2019, 07:16 PM IST
सलमान खान, रजनीकांत, श्रीदेवी यांचा 'हा' फोटो व्हायरल title=

मुंबई: बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी काळाच्या पडद्या आड गेली. त्यांना देवयाज्ञा प्राप्त होवून एक वर्ष पूर्ण होणार आहे. सोशल मीडियावर श्रीदेवींचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. या फोटोमध्ये श्रादेवींसोबत अभिनेता सलमान खान आणि अभिनेता रजनीकांत दिसत आहेत. हा फोटो फिल्ममेकर राम गोपाल वर्मा यांनी शेअर केला आहे. सर्व कपूर कुटुंब श्रीदेवींच्या पुण्यतिथीच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. महापूजेचे आयोजन श्रीदेवी यांच्या चेन्नईतील निवास स्थानी करण्याचे योजीले आहे. त्यांच्या आत्म्यास लाभण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मागिल वर्षी २४ फेब्रुवारी रोजी दुबईतील एका आलीशान हॉटेलमध्ये श्रादेवी मृत अवस्थेत अढळल्या होत्या.  आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी त्या दुबईत गेल्या होत्या.  श्रीदेवींनी पती बोनी कपूर यांना काही काळ दुबईत थांबण्यासाठी आग्रह केला होता पण बोनी कपूर कामा निमीत्त मुंबईत आले. त्यानंतर हॉटेलच्या बाथटबमध्ये श्रीदेवींचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड त्याचप्रमाणे देशभरात एकच खळबळ माजली.