'या' कारणामुळे Salman Khan तातडीने ऑस्ट्रियातून परतला मुंबईत

फोटोग्राफर्संने सलमान खानला मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना पाहिले.

Updated: Sep 27, 2021, 02:19 PM IST
 'या' कारणामुळे Salman Khan तातडीने ऑस्ट्रियातून परतला मुंबईत

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान ऑस्ट्रियामध्ये त्याच्या टायगर 3 चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईला परतला आहे.  फोटोग्राफर्संने सलमान खानला मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना पाहिले.

येथे सलमान डेनिम जीन्स आणि शर्टसह काळ्या टी-शर्ट आणि टोपीमध्ये दिसला. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि खिशात हात घालून चालत होता.

सलमान बिग बॉससाठी शूट करणार 

सलमान खान त्याच्या बिग बॉस 15 च्या होस्टिंगची जबाबदारी पार पाडणार आहे. बिग बॉस 15 चा प्रीमियर 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि सलमान परत आल्यानंतर त्याचे शूटिंग करणार आहे. नागपुरात आयोजित ऑनलाईन पत्रकार बैठकीदरम्यान सलमान खानने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, तो शोमध्ये परतण्यासाठी खूप उत्साहित आहे.

शोचा नवीन प्रोमो समोर 

सलमान खान गेल्या एक दशकापासून बिग बॉस होस्ट करत आहे. त्यांचे होस्टिंगचे हे 11 वे वर्ष आहे. या हंगामाची थीम जंगल आहे. येथे स्पर्धकांना 'संकटात जंगल' चा सामना करावा लागेल. शोचा पहिला प्रोमोही समोर आला आहे, ज्यात करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि अफसाना खान दिसतात.