Bajrangi Bhaijaan 2 : पुन्हा एकदा सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या रुपात

सलमानच्या उत्कृष्ठ सिनेमांपैकी एक सिनेमा  

Updated: Jul 19, 2021, 11:48 AM IST
Bajrangi Bhaijaan 2 : पुन्हा एकदा सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या रुपात  title=

मुंबई : सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan) सुपरहिट ठरला. या सिनेमाला प्रेक्षक आणि क्रिटिक्स यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली. 2015 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सलमानसोबतच या सिनेमाच हर्षाली मल्होत्रा  (Harshali Malhotra), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) लीड रोलमध्ये होते. (Salman Khan Bajrangi Bhaijaan Might Get A Sequel & Fans Are Already Excited) अनेक दिवसांपासून चाहते या सिक्वलची वाट पाहत आहेत. 

लेखक केवी विजेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच सलमान खानला याबाबत सांगितलं. तो देखील या सिनेमाच्या सिक्वलबाबत उत्सुक आहे. मात्र याकरता मला एक प्रॉपर गाडी हवीय जी या प्रोजेक्टला पुढे घेऊन जाईल. 

केवी पुढे म्हणाले की, सगळ्या गोष्टी सुरळित राहिल्या तर लवकरच या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात पाकिस्तानची एक लहान मुलगी चुकून भारतात येते. सलमान तिला तिच्या देशात, पाकिस्तानात परत पाठवतो. तेव्हा त्याला किती संकटांना सामोरं जावं लागतं. ते या सिनेमात दाखवलं आहे. 

या सिनेमाची गोष्ट अतिशय भावनिक होती. प्रेक्षकांनी या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. तसेच सिनेमातील बालकलाकार हर्षाली मल्होत्राला प्रेक्षकांनी पसंत केलं.  

सलमानच्या उत्कृष्ठ सिनेमांपैकी एक सिनेमा 

बजरंगी भाईजानचे सगळेच सिनेमे लोकप्रिय आहेत. तसेच सलमान खानचं आयुष्यच एका सिनेमापेक्षा काही कमी नाही. 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने 300 करोड रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 6 वर्षे झाली आहेत. नवीन सीक्वल रेकॉर्ड ब्रेक करेल अशी आशा आहे.