'बिग बॉस १४'मधील अतिशय महत्वाच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू

सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

Updated: Jan 17, 2021, 10:33 AM IST
'बिग बॉस १४'मधील अतिशय महत्वाच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू

मुंबई : लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस १४' (Bigg Boss 14) मधून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. बिग बॉस १४ ची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड (Pista Dhakad) चा अपघाती मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिस्ताचा अपघात हा अगदी Bigg Boss च्या सेटबाहेर झाला आहे. या अपघाता दरम्यान तिला गंभीर दुखापत झाली. यामध्ये भरपूर रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचं निधन झालं आहे. 

पिस्ता धाकडच्या निधनानंतर संपूर्ण टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे. टीव्ही कलाकारांना या घटनेमुळे धक्का पोहोचला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक पोस्ट करून व्यक्त केलं दुःख. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

पिस्ता धाकड ही बिग बॉस शो बनवणाऱ्या प्रोडक्शन कंपनीत एंडमोल शाइन इंडियात कामाला होती. शुक्रवारी 'विकेंडचा वार'चं शुटिंग संपवून पिस्ता धाकड आपल्या घरी जात होती. रात्री काळोख असल्यामुळे समोरचा रस्ता फार अंधूक दिसत होता. अंधेरात स्कूटी स्लिप होऊन खड्यात पडली. मागून येणाऱ्या व्हॅनिटी व्हॅनच्या खाली आल्यामुळे तिचा अपघाती निधन झाला.

पिस्ता २४ वर्षांची होती. बिग बॉससोबतच तिने खतरों के खिलाडी या टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं.