महेश मांजरेकरांच्या गाडीला अपघात; दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

पोलीस तक्रार करताच मांजरेकरांनी पळ काढला 

Updated: Jan 17, 2021, 09:51 AM IST
महेश मांजरेकरांच्या गाडीला अपघात; दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : महामार्गावर अपघातानंतर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सिने अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Car Accident) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर- पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारं वाहान धडकलं. (Mahesh Manjrekar Slap a person)  यात एक गाडी महेश मांजरेकर यांची होती. त्यांनी गाडीतून उतरून नुकसानभरपाईची मागणी करत टेंभुर्णीतील कैलास सातपुते यांना कानशिलात लगावली.

यावेळी सातपुते आणि मांजरेकर यांच्यात बाचाबाचीही झाली. मात्र पोलीस स्टेशनवर चल असं म्हटल्यावर मांजरेकर यांनी पळ काढला. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात सातपुते यांच्या तक्रारीनंतर मांजरेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. 

सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पुणे सोलापूर महामार्गावर अपघातादरम्यान मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूर-पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारं वाहन धडकले. यातील एक गाडी अभिनेते महेश मांजरेकर यांची होती.  त्यावेळी पोलीस ठाण्याला चला म्हणताच मांजरेकर यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात सातपुते यांच्या तक्रारीवरून मांजरेकर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.