नकली 6 पॅक अ‍ॅब्स दाखवत सलमान Khan करतो चाहत्यांना इंप्रेस? अखेर भाईजानचं सत्य समोर

Salman Khan: 'ही' शक्कल लढवून सलमान खान करतो चाहत्यांची दिशाभूल; अभिनेत्याला Six Pack Abs  आहेत की नाही? नक्की काय आहे सलमानच्या फिटनेसचं रहस्य  

Updated: Dec 7, 2022, 11:19 AM IST
नकली 6 पॅक अ‍ॅब्स दाखवत सलमान Khan करतो चाहत्यांना इंप्रेस? अखेर भाईजानचं सत्य समोर  title=

Salman Khan's FAKE Six Pack Abs : अभिनेता सलमान खान फक्त बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नसून अनेकांचा गॉडफादर देखील आहे. प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सलमानला सल्लू भाई, भाईजान यांसारख्या अनेक नावांनी ओळखलं जातं. अभिनय आणि फिटनेसच्या जोरावर चाहत्यांना इंप्रेस करणाऱ्या सलमानने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक भुमिका करणाऱ्या सलमान आज यशाच्या उच्च शिखरावर आहे. (salman khan house security)

सलमान खानच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सलमान खान फक्त आणि फक्त त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. पण 56 वर्षीय सलमान  Six Pack Abs दाखवण्यासाठी अनोखी शक्कल लढवत असल्याचं समोर येत आहे. (salman khan young)

भुकेच्या नादात सलमान खान करुन बसला हे काम, ऐकून धक्का बसेल

मोठ्या पडद्यावर फिट दिसण्यासाठी सलमान VFX ची मदत घेत असल्याचं समोर आलं. दबंग खानचे Six Pack Abs नसल्याचं देखील अनेकदा चर्चेत आलं. सांगायचं झालं तर सलमानचे अनेक सिनेमे जबरदस्त शरीरयष्टीमुळे हीट होतात. मध्यंतरी केआरकेने एक व्हिडीओ देखील शेअर केला. (salman khan net worth)

वाचा |  कॅमेऱ्यासमोर Arjun Kapoor च्या बहिणीनं ओलांडली हद्द ...; मलायका कमेंट करत म्हणाली...

 

केआरकेने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान जिलेटिन सूट किंवा व्हीएफएक्सच्या मदतीने 6 पॅक अॅब्स दाखवत असल्याचा दावा त्याने केला होता. सलमान खान कायम जीममध्ये  वर्कआउट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. शिवाय त्याच्या डाएटबद्दल देखील सांगत असतो. (salman khan movies and tv shows)

पण सलमानने एकदा त्यांच्या फिट शरीराबद्दल खुलासा केला. अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सिनेमात दिसत असलेले Six Pack Abs  नकली असल्याचं खुद्द अभिनेत्याने सांगितलं होतं.